Shreyas Talpade : हार्ट अटॅकनंतर कशी आहे श्रेयस तळपदे याची प्रकृती? स्वतःच केला मोठा खुलासा

Shreyas Talpade : डॉक्टरांनी श्रेयस तळपदे याला केलं होतं ‘क्लिनिकली डेड’, हार्ट अटॅकच्या 2 महिन्यांनंतर कशी आहे अभिनेत्याची प्रकृती, खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

Shreyas Talpade : हार्ट अटॅकनंतर कशी आहे श्रेयस तळपदे याची प्रकृती? स्वतःच केला मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 1:44 PM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला दोन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्याची प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबियांनी श्रेयस याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी अभिनेत्याला ‘क्लिनिकली डेड’घोषिक केलं होतं. आता दोन महिन्यांनंतर श्रेयस याने स्वतःच प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस आणि त्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘ज्यांनी माझी त्या रात्री मदत केली त्या सर्वांचे मी सर्वांत आधी आभार मानतो. डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी सर्वांचे आभार मानतो. चाहत्यांचे देखील आभार मानतो. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. माझ्यावर प्रेम केलं. मला आशीर्वाद दिले. आता माझी प्रकृती स्थिर आहे. देवाच्या कृपेने रोज प्रकृतीत सुधारणा होत आहे.’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘आता मी हळू-हळू काम करण्यासाठी देखील सुरुवात केली आहे. पण मला असं वाटतं आयुष्यात अनेकांचे कर्ज फेडायचं आहे. मी पर्याप्त धन्यवाद मानू शकत नाही. मी आनंदी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सर्वकाही हळू हळू सुरु होत आहे.’ आता श्रेयस याची प्रकृती स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

श्रेयस याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रेयस याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. श्रेयस चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकताच श्रेयस याने कुटुंबियांसोबत आनंदात वाढदिवस साजरा केला.

श्रेयस याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. ‘डोर’, ‘इकबाल’, ‘ओम शांति ओम’ आणि ‘गोलमाल’ यांसारख्या सिनेमांमधून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. श्रेयस याचा ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.