‘जे लोक मला ओळखत नाहीत..’; लग्नाच्या चर्चांवर श्रुती हासनने सोडलं मौन

अभिनेत्री श्रुती हासनने बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे ओरहान उर्फ ऑरी याने तिच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख पती असा केला. त्यानंतर आता श्रुतीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित चर्चांवर मौन सोडलं आहे.

'जे लोक मला ओळखत नाहीत..'; लग्नाच्या चर्चांवर श्रुती हासनने सोडलं मौन
Shruti HaasanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 1:13 PM

मुंबई : 27 डिसेंबर 2023 | बॉलिवूड स्टारकिड्ससोबत सतत फोटोंमध्ये दिसणारा ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरीने नुकतीच दिलेली मुलाखत तुफान चर्चेत आहे. कारण या मुलाखतीत त्याने अभिनेत्री श्रुती हासनच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख पती म्हणून केला. तेव्हापासून श्रुतीने गुपचूप लग्न उरकल्याची जोरदार चर्चा आहे. आता या चर्चा पाहून खुद्द श्रुतीने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आणि त्यात तिने तिच्या लग्नाविषयी स्पष्ट केलं आहे. दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन ही गेल्या काही काळापासून शांतनू हजारिकाला डेट करतेय.

श्रुती हासनची पोस्ट-

‘तर.. अजून माझं लग्न झालेलं नाही. जी व्यक्ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल इतक्या मोकळेपणे व्यक्त होते, ती तिच्या लग्नाबद्दलची गोष्ट का लपवणार? हे खरंच हास्यास्पद आहे. त्यामुळे जे लोक मला अजिबात ओळखत नाहीत, त्यांनी जरा शांत बसावं’, अशा शब्दांत तिने ऑरीला टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं होतं?

ऑरीने रेडिटवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली होती. यावेळी एकाने त्याला विचारलं, ‘अशी कोणती सेलिब्रिटी आहे, ज्याने तुझ्यासोबत फोटोसाठी पोझ देताना खूप ॲटिट्यूड दिला असेल? जर तू स्पष्ट नाव घेऊ शकणार नसशील तर फक्त हिंट दे.’ यावर उत्तर देताना ऑरीने लिहिलं, ‘श्रुती हासन. मी तिला फोटोसाठी पोझ देण्यास कधीच विचारलं नव्हतं. पण एका कार्यक्रमात ती माझ्याशी खूप अहंकाराने वागली. मी तर तिला त्यावेळी ओळखत पण नव्हतो. म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं. पण कदाचित काही गैरसमज झाला असावा. कारण माझी तिच्या पतीसोबत खूप चांगली ओळख आहे. वेळेनुसार या गोष्टी ठीक होतील.’

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती हासन लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “लग्न या शब्दाचीच मला खूप भीती वाटते. त्या शब्दामागे बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला त्याविषयी सध्या काहीच विचार करायचा नाही. मी त्याच्यासोबत सध्या खुश आहे, एकत्र काम करत समाधानी आहे. आम्ही दोघं एकमेकांसोबत आनंदी आहोत. ही गोष्ट एखाद्या लग्नापेक्षा चांगली नाही का”, असा सवाल तिने केला होता.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.