WTC Final नंतर सारा तेंडुलकर – शुभमन गिल ‘या’ठिकाणी लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद
सर्वत्र सारा तेंडुलकर - शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा.. दोघे 'या'ठिकाणी लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद... फोटो व्हायरल

मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघातील क्रिकेटपटू वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. अंतिम सामन्यात शुभमन गिल देखील काही खास कामगिरी करू शकला नाही.. सामना संपल्यानंतर शुभमन सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात रवाना झाला आहे. फक्त शुभमनच नाही तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर देखील यावेळी भारता बाहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शुभमन याचं नाव सारा हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. आयपीएल दरम्यान देखील सर्वांच्या नजरा शुभमन आणि सारा यांच्यावर येवून थांबल्या होत्या. एवढंच नाही तर, दोघांच्या फॅनपेजवरून देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. ज्यामुळे सर्वत्र शुभमन आणि सारा यांच्या नात्याची चर्चा रंगली होती..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप दरम्यान सारा लंडनमध्ये उपस्थित होती. लंडनहून सारा तिच्या कुटुंबासोबत केनिया याठिकाणी पोहोचली आहे.. साराने तिच्या पिकनिकचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत साराने कॅप्शनमध्ये, ‘मी कोणता एक निवडू शकली नाही…’ असं लिहिलं आहे. सध्या साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

तर शुभमन गिल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, शुभमन हा ईशान किशन याच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.. शुभमन देखील त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. शुभमन आणि सारा वेगवेगळे फिरत आहे, पण कमेंटमध्ये नेटकरी दोघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारत आहेत.. सध्या सर्वत्र शुभमन आणि सारा यांची चर्चा रंगत आहे.

शुभमन याचं नाव फक्त सारा तेंडुलकर हिच्यासोबतच नाही तर, अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील जोडण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण शुभमन गिल, सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांनी नात्यावर मौन बाळगलं आहे.
