Shubman Gill | अखेर पुरावा मिळालाच; ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरच्या मुलीला डेट करतोय शुभमन गिल

त्याचं नाव अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं. मात्र आता शुभमन नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा समोर आला आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला.

Shubman Gill | अखेर पुरावा मिळालाच; 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या मुलीला डेट करतोय शुभमन गिल
Shubman GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 7:34 AM

मुंबई: भारतीय क्रिकेटर शुभमन गिल गेल्या काही काळापासून त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे जोरदार चर्चेत आहे. त्याचं नाव अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं. मात्र आता शुभमन नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा समोर आला आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं जातंय. क्रिकेटरने त्याच्या पोस्टद्वारे चाहत्यांना ही हिंट दिली आहे की तो सारा तेंडुलकरला डेट करतोय.

शुभमन गिलच्या फोटोमागील सत्य

शुभमनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो एका रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसलेला पहायला मिळत आहे. त्याच्या हातात एक कप आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘आज पुन्हा कोणता दिवस आहे?’

सारा तेंडुलकरनेही पोस्ट केला फोटो

काही दिवसांपूर्वी म्हणजेच जुलै 2021 मध्ये सारा तेंडुलकरनेही एक फोटो पोस्ट केला होता. साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘हे सिरी, माझं जेवण कुठे आहे?’ विशेष म्हणजे सारा आणि शुभमनने पोस्ट केलेल्या या फोटोंमागील बॅकग्राऊंड अगदी सारखाच आहे. म्हणूनच नेटकरी या दोघांच्या डेटिंगविषयी चर्चा करत आहेत. या दोघांचा फोटो एकाच दिवशी काढलेला आहे, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

हे सुद्धा वाचा

शुभमन गिलच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

शुभमनने जसा त्याचा फोटो पोस्ट केला तसं नेटकरी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करू लागले. एका युजरने लिहिलं, ‘सारा तेंडुलकरवाला बॅकग्राऊंड’. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘मागे डावीकडे जी मुलगी आहे, तीसुद्धा दोन्ही फोटोंमध्ये सारखीच दिसतेय.’ आणखी एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय, ‘लक्षपूर्वक पहा, यामध्ये शुभमनची हेअरस्टाइल वेगळी आहे, म्हणजेच हा फोटो जुना आहे.’

सारा अली खानसोबतही जोडलं गेलं नाव

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खानशीही जोडलं गेलं होतं. जेव्हा शुभमनने सेंच्युरी मारली, तेव्हा चाहते सारा-सारा म्हणून ओरडत होते.

‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला या शोमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं होतं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं शुभमनला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...