BMW, Audi सारख्या महागड्या कारची मालकीण श्वेता तिवारी, संपत्ती जाणून व्हाल थक्क

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा दोन वेळा घटस्फोट, दोन्ही पतींनी सोडली साथ, सिंगल मदर म्हणून करते मुलांचा सांभाळ, जगते रॉयल आयुष्य..., अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती, महागड्या गाड्या आणि बरंच काही..., श्वेता तिवारी कायम असते खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

BMW, Audi सारख्या महागड्या कारची मालकीण श्वेता तिवारी, संपत्ती जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 4:19 PM

अभिनेता श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘कसोटी जिंदगी की’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. श्वेताने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात अभिननेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. दोन मुलांसोबत अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीकडे महागड्या गाड्या देखील आहेत.

श्वेता तिवारीने तिच्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये दूरदर्शनच्या शो ‘कलीरे’मधून केली होती. 2004 मध्ये अभित्रीने ‘मधोशी’ या बॉलिवूड सिनेमातून डेब्यू केला होता. अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेताला प्रेरणा म्हणून ओळख मिळाली.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर अभिनेत्री विवादीत शो ‘बिग बॉस 4’ मध्ये दमदार खेळ खेळत विजय मिळवाल. श्वेता हिने स्वतःच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर झगमगत्या विश्वात भक्कम स्थान निर्माण केलं आहे. श्वेता मालिका, सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधींची माया कमवते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता तिवारी हिची नेटवर्थ 81 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीचं मुंबईतील कांदिवली येथे एक आलिशान घर आहे. ज्यामध्ये ती मुलं आणि आईसोबत राहते. अभिनेत्रीने अनेक महागड्या वस्तूंनी घर सजवलं आहे. श्वेता हिच्याकडे Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730LD यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री दुसऱ्या घटस्फोटानंतर सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पलक तिवारी देखील आईसारखीच प्रचंड सुंदर दिसते. चाहते देखील पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील श्वेता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.