श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नात कशी दिसत होती लेक पलक, सावत्र बापासोबत फोटो व्हायरल
Shweta Tiwari Second Wedding Photo: श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नाचे अनसीन फोटो आले समोर, कशी दिसत होती लेक पलक, सावत्र बापासोबत पलकचे फोटो व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिच्या दुसऱ्या लग्नाच्या फोटोंची चर्चा...
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी आता मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांश तिवारी यांच्यासोबत राहाते. वयाच्या 18 व्या वर्षी श्वेता हिने पहिलं लग्न केलं होतं. पण अभिनेत्रीचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर श्वेता तिवारी हिने 13 जुलै 2013 मध्ये अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर श्वेता हिचा 27 नोव्हेंबर 2016 मध्ये दुसरा घटस्फोट झाला. सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही खासगी आयुष्यांमुळए चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील श्वेता तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील श्वेता हिच्या दुसऱ्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये श्वेता आनंदी दिसत आहे. रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 4’ च्या ग्रँड फिनालेला देखील अभिनव श्वेता आणि तिच्या कुटुंबासोबत होता. ‘बिग बॉस’नंतर दोघांनी लग्न केलं.
श्वेता तिवारी हिच्या दुसऱ्या लग्नात पलक तिवारी लहान होती. पलक हिचे सावत्र बापासोबत काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र श्वेता तिवारी हिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. दोन लग्न आणि दोन घटस्फोटांमुळे अनेकदा श्वेता हिने ट्रोलिंचा देखील सामना केला आहे.
एका मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली होती, ‘मी गोल्ड डिगर आहे… असे लोकांचे विचार आहेत. लग्न केल्यानंतर मी पैसे घेते आणि नवऱ्याला सोडून देते… असं देखील लोकं मला म्हणतात. अशा वाईट कमेंट करणाऱ्यांना फक्त असंच बोलायला आवडतं..’
‘मला काहीही फरक नाही पडत लोकं मला काय बोलतात, ते माझ्याबद्दल काय विचार करतात. मला जे करायचं आहे, तेच मी करते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. घटस्फोटानंतर श्वेता तिवारी एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे. आज अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आहे.
श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून पलक हिने अभिनयात करियरला सुरुवात केली. पलक फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पलक अभिनेता सैफ अली खान याचा मुलगी इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याची चर्चा आहे.
इब्राहिम आणि पलक यांना एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.