सिद्धांत सूर्यवंशीच्या आठवणीत पत्नीची भावूक पोस्ट; ‘मी जिवंत असेपर्यंत..’

सिद्धांत सूर्यवंशीच्या निधनानंतर पत्नीची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

सिद्धांत सूर्यवंशीच्या आठवणीत पत्नीची भावूक पोस्ट; 'मी जिवंत असेपर्यंत..'
दिवंगत अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीच्या पत्नीची भावूक पोस्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 10:22 AM

मुंबई- प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांच्या निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. जिममध्ये व्यायाम करताना ते अचानक बेशुद्ध झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं. 11 नोव्हेंबर रोजी सिद्धांत यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धांत यांची पत्नी एलिसिया राऊत हिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

सिद्धांत 46 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने एलिसिया पूर्णपणे खचली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने भावना व्यक्त केल्या आहेत. पाच वर्षांपूर्वीच सिद्धांत आणि एलिसियाचं लग्न झालं होतं. 2017 या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

हे सुद्धा वाचा

सिद्धांत यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत एलिसियाने लिहिलं, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जोपर्यंत मी जिवंत असेन तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करीन. 24 फेब्रुवारी 2017.. आपल्या दोघांचा पहिल्यांदाच एकत्र काढलेला हा फोटो. या दिवसापासून तुला माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य बघायचं होतं. मी आयुष्यावर भरभरून प्रेम करावं, नव्या गोष्टी शिकाव्यात यासाठी तू नेहमीच प्रेरणा द्यायचा.’

‘मी वेळेवर जेवावं यासाठी तू नेहमी आग्रही असायचा. कोणत्याही भितीशिवाय माझा हात धरणारा तू एकमेव होतास. तुझं हास्य, तुझ्या डोळ्यांतील प्रेम, तू व्यक्त केलेली काळजी नेहमीच मला, मार्कला आणि डिझाला आठवेल. प्रेमळ मुलगा, प्रेमळ भाऊ, प्रेमळ पिता, प्रेमळ पती, प्रेमळ मित्र.. तुझ्यावर सदैव खूप प्रेम करेन’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Alesia Raut (@allylovesgym)

सिद्धांत यांनी कुसूम या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं आनंद हे नाव बदलून सिद्धांत असं ठेवलं. 2017 मध्ये त्यांनी मॉडेल एलिसिया राऊतशी दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून सिद्धांत यांना एक मुलगी आहे. डिझा असं तिचं नाव आहे. तर एलिसियापासून त्यांना एक मुलगा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.