Siddharth Chandekar | ‘आता मी तुझं लग्न लावतोय..’; सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा नवा उत्तरार्ध, पहा फोटो

सायली संजीव, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, प्रसाद ओक, गायत्री दातार, जितेंद्र जोशी, क्षितीज पटवर्धन, हेमंत ढोमे, गौरी नलावडे, क्षिती जोग, मधुराणी प्रभुलकर, स्पृहा जोशी यांसारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Siddharth Chandekar | 'आता मी तुझं लग्न लावतोय..'; सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा नवा उत्तरार्ध, पहा फोटो
Siddharth Chandekar mother weddingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 10:44 AM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : आईचं दुसरं लग्न म्हटलं की आपल्या समाजात आजही भुवया उंचावल्या जातात. मुलं मोठी होईपर्यंत, त्यांची लग्न होईपर्यंत आणि अगदी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आई-वडील आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी वाहवून घेतात. मात्र या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना जेव्हा आई किंवा वडील एकटे पडतील, असा विचार सहसा केला जात नाही. त्यांनाही उतारवयात एका जोडीदाराची गरज असेल, असा प्रश्न सहसा पडत नाही. तो प्रश्न पडला तरी त्यावर अंमलबजावणी तितक्या सहजतेने होत नाही. मात्र हेच महत्त्वाचं पाऊल अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने उचललं आहे. सिद्धार्थच्या आईने नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. आयुष्याचा हा नवा उत्तरार्ध नव्या जोडीदारासोबत घालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिताली मयेकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

‘हॅपी सेकंड इनिंग आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं राहायचं? तू आतापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यू आई,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मिताली मयेकरची पोस्ट-

‘हॅपी मॅरीड लाइफ सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सुना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितीन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम,’ अशी पोस्ट मितालीने लिहिली.

सिद्धार्थ आणि मितालीच्या या पोस्टवर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून आणि सर्वसामान्य नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सायली संजीव, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, प्रसाद ओक, गायत्री दातार, जितेंद्र जोशी, क्षितीज पटवर्धन, हेमंत ढोमे, गौरी नलावडे, क्षिती जोग, मधुराणी प्रभुलकर, स्पृहा जोशी, सुखदा खांडकेकर, गौतमी देशपांडे, अभिजीत खांडकेकर यांसारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.