सिद्धार्थ मल्होत्रा सर्वांसमोर पत्नी किआरा हिला असं काय म्हणाला, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले!

लग्नाआधी चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात लग्नानंतर कसं आहे नातं... अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडीओमुळे सत्य समोर

सिद्धार्थ मल्होत्रा सर्वांसमोर पत्नी किआरा हिला असं काय म्हणाला, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले!
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:54 AM

kiara advani and sidharth malhotra : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी ७ फेब्रुवारी रोजी शाही थाटात लग्न केलं. आजही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय लग्नानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगत असते. आता देखील सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल, सिद्धार्थ आणि किआरा यांच्यातील नातं कसं आहे. सध्या सर्वत्र सिद्धार्थच्या व्हिडीओची चर्चा तुफान रंगत आहे.

व्हिडीओमध्ये सिद्धार्थने पहिल्यांदा किआराचा सर्वांसमोर ‘वाईफ’ म्हणून उल्लेख केला आहे. सिद्धार्थ – किआरा यांच्या एक फॅनपेजवरून अभिनेत्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ म्हणतो, ‘हे माझं नाईट परफ्यूम रेंजसाठी नवे एडिशन होणार आहे. माझ्या पत्नीला हे आवडेल.. अशी आशा करतो..’ असं सिद्धार्थ व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. चाहत्यांना सिद्धार्थचा क्यूट अंदाज प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र सिद्धार्थ आणि किआरा यांच्या नात्याची चर्चा आहे.

लग्नानंतर सिद्धार्थ – किआरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची देखील मोठी गर्दी जमलेली असते. शिवाय सोशल मीडियावर कपल सतत त्यांच्या मेहंदी, हळदी, संगीत आणि लग्नाचे फोटो पोस्ट करत असतात. चाहत्यांना देखील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड आवडतात. (sidharth malhotra and kiara advani)

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड सुंदर दिसत आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत किआरा हिने कॅप्शनमध्ये, ‘आता आमची कायमची बुकिंग झाली आहे…’ असं लिहिलं आहे.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)

सिद्धार्थ – किआरा यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘सत्य प्रेम की कथा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ रोहित शेट्टी याच्या ‘कॉप-सीरिज इंडियन पोलीस फोर्स ‘ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सिद्धार्थ याच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.