Sidharth-Kiara | संगीत कार्यक्रमातील कियाराचा व्हिडीओ व्हायरल; ‘बोले चूडियाँ’ गाण्यावर केला डान्स

हळदीच्या कार्यक्रमातील एक क्लीप लीक झाली होती. त्यानंतर कठोर पावलं उचलत लग्नाला उपस्थित असलेल्या स्टाफ आणि पाहुण्यांचे फोन एका प्लास्टिक कव्हरमध्ये पॅक केले गेले.

Sidharth-Kiara | संगीत कार्यक्रमातील कियाराचा व्हिडीओ व्हायरल; 'बोले चूडियाँ' गाण्यावर केला डान्स
संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ आला समोरImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 6:12 PM

जैसलमेर: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. 7 फेब्रुवारी रोजी या बहुचर्चित जोडीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये अत्यंत शाही पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. या लग्न समारंभात पाहुण्यांना काटेकोरपणे ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागतं होतं. असं असूनही हळदीच्या कार्यक्रमातील एक क्लीप लीक झाली होती. त्यानंतर कठोर पावलं उचलत लग्नाला उपस्थित असलेल्या स्टाफ आणि पाहुण्यांचे फोन एका प्लास्टिक कव्हरमध्ये पॅक केले गेले. यादरम्यान आता कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कियाराच्या संगीत कार्यक्रमातील असल्याचं म्हटलं जात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये कियारा तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसतेय. करीना कपूरच्या ‘बोले चूडियाँ’ या गाण्यावर कियारा आणि तिची गर्ल गँग नाचतेय. यामध्ये कियाराने सिल्वर कलरचा लेहंगा परिधान केला आहे. हा व्हिडीओ तिच्या संगीत कार्यक्रमातील आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सिद्धार्थ आणि कियाराच्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये शाहिद कपूर, मीरा राजपूत, जुही चावला, इशा अंबानी, मनिष मल्होत्रा यांचा समावेश होता. सोमवारी संध्याकाळपासूनच सूर्यगढ पॅलेसच्या बाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. या पॅलेसला गुलाबी रंगाच्या लाइट्सने सजवण्यात आलं होतं.

पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 आलिशान रुम्स बुक करण्यात आले होते. तर लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 80 गाड्यांचीही सुविधा करण्यात आली होती.

कियारा अडवाणीने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर 2010 मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही”, असं ती म्हणाली होती.

सिद्धार्थ- कियाराचा वेडिंग लूक

कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. यावेळी कियारा बेबी पिंक लेहंग्यामध्ये तर सिद्धार्थ गोल्डन शेरवानीमध्ये दिसला. कियाराच्या ब्रायडल ज्वेलरीबद्दल बोलायचं झाल्यास तिने यासाठी सुद्धा मनिष मल्होत्राच्या कलेक्शनची निवड केली. कियाराच्या लग्नातील ही खास ज्वेलरी अल्ट्रा-फाइन हँडकट डायमंड्सने बनवली गेली आहे. हा कस्टम मेड स्पेशल डायमंड ज्वेलरी सेट मनिष मल्होत्राने खास कियारासाठी डिझाइन केला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.