Sidharth Malhotra – Kiara Advani यांच्या लग्नानंतर रिसेप्शनबद्दल मोठी अपडेट समोर
लग्नानंतर रंगणार Sidharth Malhotra - Kiara Advani याचा रिसेप्शन सोहळा? कपलच्या लग्नासाठी पाहुणे सज्ज, पण रिसेप्शनसाठी मात्र...
Sidharth Kiara Wedding Reception: अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नात किआरा बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घालणार आहे. मेहंदी, हळदी, लग्न… यासर्व विधींनंतर किआरा – सिद्धार्थ एक नाही तर दोन वेळा रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. लग्नानंतर किआरा – सिद्धार्थ याचं एक रिसेप्शन मुंबई याठिकाणी होणार आहे तर दुसरं रिसेप्शन दिल्ली येथे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किआरा – सिद्धार्थ १२ फेब्रुवारी रोजी रिसेप्शनसाठी पाहुण्यानं निमंत्रण पाठवणार आहेत. याआधी प्रियांका चोप्रा – निक जोनास, दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांनी देखील लग्नानंतर भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी दोघांनी जवळपास 100-150 पाहुण्यांना निमंत्रण दिलं आहे.
किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाहुण्यांना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंधनकारक असणार आहे. किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नासाठी मित्र परिवार आणि कुटुंबिय विवाहस्थळी पोहोचले आहेत. अभिनेता शाहीद कपूर याला देखील पत्नी मीरा राजपूत हिच्यासोबत किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नासाठी जाताना विनामतळावर स्पॉट करण्यात आलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या.
किआरा – सिद्धार्थ लवकरच ६ फेब्रुवारी रोजी विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साह सुरु आहे. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ तारखेला किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या आधीच्या विधी पार पडणार आहेत. (sidharth malhotra kiara advani wedding festivities)
महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. आता लवकरच किआरा – सिद्धार्थ पती – पत्नीच्या रुपात चाहत्यांच्या समोर येणार आहे. आता दोघांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय ठेवण्यात आल्यामुळे दोघांच्या लग्नाच्या फोटोंच्या प्रतीक्षेत चाहते आहे.