Sidharth Kiara Wedding | संगीत कार्यक्रमात सिद्धार्थ मल्होत्राचे वडील अचानक पडले आजारी

6 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. मात्र संगीत कार्यक्रमादरम्यान सिद्धार्थच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. सिद्धार्थच्या वडिलांना अचानक उल्ट्या होऊ लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावलं.

Sidharth Kiara Wedding | संगीत कार्यक्रमात सिद्धार्थ मल्होत्राचे वडील अचानक पडले आजारी
सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 4:45 PM

जैसलमेर: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज (7 फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पर पडणार आहे. 6 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. मात्र संगीत कार्यक्रमादरम्यान सिद्धार्थच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. सिद्धार्थच्या वडिलांना अचानक उल्ट्या होऊ लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावलं. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारानंतर त्यांना काही तास आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सिद्धार्थच्या वडिलांच्या तब्येतीचा विचार करता संगीत कार्यक्रमातील गाण्यांचा आवाज कमी करण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.

सिद्धार्थ आणि कियाराच्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील मोजके सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. यामध्ये शाहिद कपूर, मीरा राजपूत, जुही चावला, इशा अंबानी, मनिष मल्होत्रा यांचा समावेश आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच सूर्यगढ पॅलेसचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. या पॅलेसला गुलाबी रंगाच्या लाइट्सने सजवण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. शनिवारी कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबीयांसह जैसलमेरला रवाना झाले. यावेळी एअरपोर्टवर कियारा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत दिसली. त्यामुळे लग्नात ती मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी

जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 आलिशान रुम्स बुक करण्यात आले आहेत. तर लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 80 गाड्यांचीही सुविधा करण्यात आली आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागणार आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ शकणार नाहीत. याआधी बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्नात ‘नो फोन पॉलिसी’चं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं.

मंगळवारी दुपारपासून या लग्नाचे अपडेट्स समोर येत आहेत. सिद्धार्थने ‘साजन जी घर आए’ या गाण्यावर मंडपात एण्ट्री केली. पंजाबी परंपरेनुसार लग्नाचे विधी पार पडणार असल्याचं कळतंय.

सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.