बिग बॉसमुळे नेहा भसीन हिचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर, खळबळजनक खुलासा
नेहा भसीन ही नेहमीच चर्चेत असते. नेहा भसीन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहा भसीन ही बिग बाॅसमध्ये देखील सहभागी झाली. नेहा भसीन मोठ्या वादात देखीस सापडली.
मुंबई : नेहा भसीन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणे गायली आहेत. नेहा भसीन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी आणि बिग बाॅस 15 मध्ये नेहा भसीन ही धमाका करताना दिसली. मात्र, नेहा भसीन आणि प्रतिक सहजपाल याच्या रिलेशनच्या विविध चर्चा रंगताना दिसल्या. यादरम्यान लोकांनी नेहा भसीन हिला खडेबोल देखील सुनावले. सोशल मीडियावर सतत नेहा भसीन हिला ट्रोल देखील केले गेले.
आता नुकताच नेहा भसीन हिने धक्कादायक खुलासा केलाय. इतकेच नाही तर बिग बाॅसमुळेच आपले आयुष्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे देखील तिने म्हटले आहे. बिग बाॅसमधून बाहेर आल्यानंतर आपले करिअर खराब झाल्याचे देखील तिने म्हटले. ट्रोलर्सबद्दल थेट पहिल्यांदाच बोलताना नेहा भसीन ही दिसली आहे. नेहा भसीन हिने मोठे खुलासे देखील केले.
नेहा भसीन म्हणाली की, या लोकांनी माझ्यासाठी जेवण देखील ठेवले नाही. मी एकटी असताना माझे साधे कोणीही अश्रू देखील पुसले नाहीत. या लोकांनी मला काम दिले नाही. माझ्या वडिलांचे ज्यावेळी निधन झाले आणि त्यांना कॅन्सर झाला त्यावेळी कोणी नव्हते तिथे. मला दर आठवड्याला जाऊन त्यांची सेवा करावी लागत.
View this post on Instagram
माझ्या वाईट आणि चांगल्यावेळी हे तिथे नव्हते. मला वाटते की, लोक अनेक गोष्टींवर ट्रोल होऊ लागतात हे खूप वाईट आहे. पुढे नेहा म्हणाली, बिग बाॅसच्या नंतरचे वर्षे माझ्यासाठी खरोखरच खूप जास्त कठीण राहिले. पण आता सर्व काही ठिक आहे. आता सर्वकाही संपले आहे. नेहा भसीन ही सध्या तूफान चर्चेत देखील आहे.
नेहा भसीन आणि प्रतिक सहजपाल यांच्या रिलेशनवर अनेक चर्चा झाल्या. मात्र, कधी प्रतिक सहजपाल आणि नेहा भसीन यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. बिग बाॅसच्या घरात असताना दोघांचे एक रिलेशन बघायला मिळाले. मात्र, बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर यांच्यामध्ये काही विशेष रिलेशन राहिल नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, थेट बिग बाॅसनंतर करिअर बर्बाद झाल्याचे नेहा हिने म्हटले.