संगीत विश्वाला मोठा धक्का… प्रसिद्ध गायिकेचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नव्या वर्षाच्या सुरुवातीला संगीत विश्वाला मोठा धक्का; लेकीने लिहिलेली पोस्ट चर्चेत

संगीत विश्वाला मोठा धक्का... प्रसिद्ध गायिकेचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संगीत विश्वाला मोठा धक्का... प्रसिद्ध गायिकेचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 11:42 AM

मुंबई : वर्षाच्या सुरुवातीला संगीत विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी सुमित्रा सेन यांना अखेरचा श्वास घेतला. सुमित्रा सेन यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी श्राबनी सेन यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आईच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आई आज भोरमध्ये आम्हाला सोडून गेली…’ अशी पोस्ट श्राबनी सेन यांनी केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. म्हणून त्यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचं निदान झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली, अखेर ३ जानेवारीला पहाटे सुमित्रा सेन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगित विश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुमित्रा सेन यांची मुलगी श्राबनी सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळाच्या समस्यांनी त्या त्रस्त होत्या. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुमित्रा सेन यांना घरी आणण्यात आलं. घरी आल्यानंतर नव्या वर्षी सुमित्रा यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुमित्रा सेन यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सुमित्रा सेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.