Smriti Irani | स्मृती इराणी यांनी मैत्रिणीच्या पतीशी केलं लग्न? चाहत्याच्या प्रश्नावर दिलं उत्तर
स्मृती इराणी यांनी 2001 मध्ये जुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना जोहर हा मुलगा आणि जोइश ही मुलगी आहे. जुबिन यांनी त्याआधी मोना इराणीशी लग्न केलं होतं. जुबिन आणि मोना यांना शानेल ही मुलगी आहे.
नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : खासदार स्मृती इराणी सध्या राहुल गांधी यांच्यावर फ्लाइंग किसचा आरोप केल्यामुळे चर्चेत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे त्यांनी नुकतीच चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने त्यांना पती जुबीन इराणी यांच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं की, मोना त्यांची बालपणीची मैत्रीण नाही.
स्मृती इराणी यांनी मैत्रिणीच्या पतीशी केलं लग्न?
‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान त्यांनी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. यादरम्यान एका युजरने त्यांना असा प्रश्न विचारला की त्यांचा पाराच चढला. ‘तुम्ही तुमच्या बालमैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं का’, असा सवाल संबंधित युजरने विचारला. त्यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिलं, ‘मोना माझी लहानपणीची मैत्रीण नाही.’
याविषयी त्या पुढे लिहितात, ‘नाही.. मोना माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ती माझी बालमैत्रीण असूच शकत नाही. हा कौटुंबिक विषय आहे, राजकीय नाही. त्यामुळे या राजकारणात त्यांना मधे खेचू नका. माझ्याशी भांडा, माझ्यासोबत चर्चा करता, माझ्याबद्दल वाट्टेल ते बोला. पण माझ्यासोबत अशा व्यक्तीला या गटारात खेचू नका ज्या व्यक्तीचा राजकारणाशी काही घेणं-देणं नाही. ती सन्मानास पात्र आहे.’
स्मृती इराणी यांनी 2001 मध्ये जुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना जोहर हा मुलगा आणि जोइश ही मुलगी आहे. जुबिन यांनी त्याआधी मोना इराणीशी लग्न केलं होतं. जुबिन आणि मोना यांना शानेल ही मुलगी आहे. ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये स्मृती यांना एका युजरने टीव्ही इंडस्ट्रीविषयी प्रश्न विचारला. ‘मॅडम तुम्हाला तुमच्या जुन्या टीव्हीच्या दिवसांची आठवण येते का? जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.’
या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मी जर-तरच्या गोष्टींमध्ये जगत नाही. जेव्हा मी टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होते, तो काळ खूप चांगला होता. तो काळ पुन्हा येईल का? ही गोष्ट योग्य वेळच सांगू शकेल. कारण आयुष्य नेहमी हेच शिकवतं की कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणू नका.’