Salman Khan: ‘सिगारेटचे चटके दिले, मारहाण केली’; सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक आरोप

सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडकडून शारीरिक शोषणाचा आरोप; नेमकं काय आहे प्रकरण?

Salman Khan: 'सिगारेटचे चटके दिले, मारहाण केली'; सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक आरोप
Somy Ali and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 10:18 AM

मुंबई: बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमीने पुन्हा एकदा बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमानवर निशाणा साधला आहे. सोमीने सलमानसोबतचा जुना फोटो शेअर करत त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला. मात्र या आरोपांनंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली. सोमी ही सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड होती असं म्हटलं जातं. या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होतात. याआधीही सोमीने सलमानवर गंभीर आरोप केले होते.

काय होती सोमीची पोस्ट?

सोमीने सलमानसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये सलमान तिला गुलाबाचं फूल देताना दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘आता बरंच काही घडणार आहे. माझ्या शोला भारतात बंदी आणली आणि मला धमकावलं. तू भित्रा आहेस. इथे माझ्या सुरक्षेसाठी 50 वकील उभे आहेत, जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि शारीरिक शोषणापासून वाचवतील. हेच तू माझ्यासोबत बरीच वर्षे करत होतास.’

‘त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे, जे महिलांना मारहाण करणाऱ्या या व्यक्तीची साथ देतात. अशा अभिनेत्यांनाही लाज वाटली पाहिजे, ज्यांनी त्याची साथ दिली. आता लढण्याची वेळ आली आहे’, असं धक्कादायक विधान तिने या पोस्टमध्ये केलं आहे.

हे सुद्धा वाचा

सोमी अलीची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र थोड्या वेळानंतर तिने ही पोस्ट डिलिट केली. सोमीने ही पोस्ट डिलिट का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र तिच्या या पोस्टमुळे बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

सलमान आणि सोमी अलीचं नातं

एकेकाळी जेव्हा सोमी आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा सलमानची ऐश्वर्यासोबतची जवळीक वाढली होती. कारण सलमान त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यानंतर ऐश्वर्यानेही सलमानवर मारहाण आणि फोनवर धमकी दिल्याचा आरोप केला होता.

पाकिस्तानी वंशाच्या सोमी अलीने सांगितलं होतं की, ती फक्त सलमानसाठी भारतात आली होती आणि चित्रपटात काम केलं होतं. जेणेकरून नंतर ती सलमानसोबत लग्न करू शकेल. पण जवळपास 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं नातं तुटलं. 1991 ते 1997 दरम्यान, सोमी अलीने 10 हून अधिक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं होतं. सध्या ती परदेशात एक एनजीओ चालवते.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.