Shehnaaz Gill | ‘शॉर्टकटने पैसे कमावते’; शहनाज गिलवर का भडकली प्रसिद्ध गायिका?

आता पुन्हा एकदा शहनाज इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. मात्र तिच्यावर बॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका नाराज असल्याचं दिसतंय. ही गायिका आहे सोना मोहपात्रा. सोनाने शहनाजविरोधात एक ट्विट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे तिला शहनाजचे चाहते ट्रोल करत आहेत.

Shehnaaz Gill | 'शॉर्टकटने पैसे कमावते'; शहनाज गिलवर का भडकली प्रसिद्ध गायिका?
Shehnaaz GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 9:54 AM

मुंबई : ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. शहनाज तिच्या सहज आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. बिग बॉसच्या घरात असताना तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडलं गेलं होतं. पण सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. आता पुन्हा एकदा शहनाज इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. मात्र तिच्यावर बॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका नाराज असल्याचं दिसतंय. ही गायिका आहे सोना मोहपात्रा. सोनाने शहनाजविरोधात एक ट्विट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे तिला शहनाजचे चाहते ट्रोल करत आहेत.

सोना मोहपात्राची टीका

सोना मोहपात्रा नेहमीच तिच्या ट्विट्समुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी तिने सोशल मीडियावर शहनाज गिलबद्दल ट्विट केलं. शहनाज नुकतीच एका कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात तिच्याकडे गाण्याचा आग्रह करण्यात आला. शहनाज गात असतानाच तिला अजानचा आवाज ऐकू आला आणि त्यामुळे ती थांबली. शहनाजच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक झालं.

हे सुद्धा वाचा

साजिद खानवरून साधला निशाणा

यानंतर सोना मोहपात्राला तो दिवस आठवला, जेव्हा शहनाजने बिग बॉस 16 मध्ये भाग घेतलेल्या साजिद खानला पाठिंबा दिला. “लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला नॅशनल टीव्हीवर दाखवलं गेलं. तिने तिच्या बहिणींचा थोडा आदर केला असता तर बरं झालं असतं”, असं सोना मोहपात्राने लिहिलं. मात्र या ट्विटनंतर तिलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

‘शॉर्टकटने कमावते पैसे’

साजिद खानला पाठिंबा दिल्याने शहनाज गिलवर का निशाणा साधला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. तर सोना मोहपात्राला शहनाजबद्दल ईर्षा वाटते, असंही काहींनी म्हटलंय. चारही बाजूंनी होत असलेली टीका पाहून सोनाने आणखी एक ट्विट केलं. ‘प्रिय ट्रोल्स, जॅकलिनसारख्या आणखी एका अभिनेत्रीसोबत उभं राहण्याचा प्रयत्न करत आहात. मला माहीत नाही की शहनाजमध्ये असं कोणतं खास टॅलेंट आहे? तिला फक्त एका दर्जा नसलेल्या टीव्ही रिॲलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली आहे. मी अशा महिलांना खूप चांगल्याप्रकारे ओळखते, जे शॉर्टकटने पैसे कमावतात’, अशा शब्दांत तिने सुनावलं.

सोना मोहपात्राच्या या दुसऱ्या ट्विटनंतरही तिच्यावर जोरदार टीका झाली. शहनाजच्या नावाने स्वत:कडे प्रसिद्धी खेचणं सोनाने सोडलं पाहिजे, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. याप्रकरणी अद्याप शहनाजची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.