शत्रुघ्न सिन्हा यांना जावायाने दिले मोठे गिफ्ट, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर…
सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आलीये. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले. काही वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाक्षी सिन्हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, तिला तिच्या आई वडिलांच्या घरीची आठवण येत आहे.
नुकताच शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. दोघांनी आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या. मुलगा लव सिन्हा यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांना जावई झहीर इक्बाल याने या दिवशी मोठे सरप्राईज दिले. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या घरी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जावई झहीर इक्बाल याच्याकडून शत्रुघ्न सिन्हा यांना मोठे सरप्राईज मिळाले.
शत्रुघ्न सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्यामध्ये खास नाते तयार झाल्याचे देखील सांगितले जाते. हेच नाहीतर लग्नामध्येही जावायासोबत बॉन्ड शेअर करताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नात अनेक हिंदू रितीरिवाज देखील पार करण्यात आले. एका फोटोमध्ये जावायाला आणि मुलीला आर्शिवाद देताना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम या दिसल्या.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर सोनाक्षी सिन्हाने देखील बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केलाय. सोनाक्षीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे सोनाक्षीचे हे चित्रपट धमाका करतात. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.