लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिचा भावांसोबत वाढला वाद? ‘ते’ फोटो व्हायरल होताच सिन्हा कुटुंबातील…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून रोजी लग्न केले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीरने तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सातत्याने ऐकायला मिळाले. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिचे आई वडील आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला जरी तिचे आई वडील उपस्थित असले तरीही तिच्या दोन्ही भावांनी लग्नाकडे पाठ फिरवली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन मुंबईमध्ये केले होते. विशेष म्हणजे या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. सलमान खानही या पार्टीत धमाल करताना दिसला होता.
नुकताच शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचा लग्नाचा 44 वा वाढदिवस झालाय. शत्रुघ्न सिन्हा यांचा लेक लव सिन्हा याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आपल्या आणि झहीरच्या नवीन घरात साजरा केला.
सोनाक्षी सिन्हाने एक खास पार्टी ठेवली होती. चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हाचे सासरे देखील दिसत आहेत. मात्र, या पार्टीत कुठेही सोनाक्षी सिन्हाचे भाऊ लव आणि कुश हे दिसत नाहीत. यामुळेच आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत तिच्या भावांनी नाते तोडले असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच लव सिन्हा याने सोशल मीडियावर एक पोस्ट सोनाक्षी सिन्हा हिच्या सासऱ्यांच्या विरोधात शेअर केली होती. मात्र, काही वेळामध्येच लवने ती पोस्ट डिलीट केली. त्यामध्येच आता आई वडिलांच्या लग्न वाढदिवसाच्या पार्टीलाही लव आणि कुश पोहोचले नसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.