संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ‘हिरा मंडी’मध्ये दिसणार एका खास भूमिकेत
सोनाक्षी आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सोबत काम करणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी आपल्या नव्या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाला साईन केलंय.
मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) आपल्या करिअरची सुरुवात सलमान खान सोबत दबंगमधून केली होती. या चित्रपटानंतर सोनाक्षीने वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमध्ये काम केलंय. आता सोनाक्षी सिन्हाने एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतलाय. सोनाक्षी आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सोबत काम करणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी आपल्या नव्या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाला साईन केलंय. हा चित्रपट सोनाक्षीच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा चित्रपट ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. (Sonakshi Sinha will be seen in a special role in Sanjay Leela Bhansali’s upcoming film Hira Mandi)
सोनाक्षी कोणत्या चित्रपटात काम करणार?
संजल लीला भन्साळी यांचा अपकमिंग चित्रपट हीरा मंडीमध्ये सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींची निवड केलीय. सोनाक्षी सिन्हापूर्वी अभिनेत्री हुमा कुरेशीलाही या चित्रपटासाठी साईन करण्यात आलंय. यापूर्वी सोनाक्षी सिन्हाने राऊडी राठोडमध्ये संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनमध्ये काम केलं होतं. मात्र आता सोनाक्षी खुद्द संजय लीला भन्साळीसोबत हीरा मंडी या चित्रपटात काम करणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या मेकर्सनी सोनाक्षीला कास्ट केल्याबाबत अद्याप जाहीर केलं नाही.
कसा असेल सोनाक्षीचा रोल?
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात सोनाक्षी सेक्स वर्करच्या भूमिकेत पाहायला मिळेल. सोनाक्षीने या महत्वाच्या रोलसाठी आतापासूनच तयारी सुरु केल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. इतकंच नाही तर सोनाक्षीने कथक शिकायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. संजय लीला भन्साळीची हीरा मंडी ही एक बिग बजेट वेब सीरीज असणार आहे.
सोनाक्षी सिन्हा या काळात येणारा चित्रपट ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ मुळे बातम्यांमध्ये आहे. या चित्रपटात सोनाक्षीसह अजय देवगन आणि संजय दत्तसारखे अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. दुसरीकडे सोनाक्षीने आतापर्यंत लुटेरा, दबंग सीरीज, आर राजकुमार, अकीरा, कलंक, मिशन मंगल, सन ऑफ सरदारसारख्या अनेक चित्रपटातून आपल्या कलाकारी सादर केलीय.
मराठी कलासृष्टीला मिळणार मनसेची सुरक्षा, अमेय खोपकर यांचं मराठी कला विश्वाला आवाहन https://t.co/mnZePAAhp2 @RajThackeray @mnsadhikrut @CMOMaharashtra @OfficeofUT #RajuSapte #RajuSapteSuicide #AmeyKhopkar #RajThackeray #MNS
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
संबंधित बातम्या :
Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर-किरणचा घटस्फोट फातिमा शेखमुळे?, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा
Sonakshi Sinha will be seen in a special role in Sanjay Leela Bhansali’s upcoming film Hira Mandi