बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती; भारतातच नाही तर, परदेशातही भव्य बंगला

कोट्यवधींची संपत्ती, दागिने, महागड्या गाड्यांचं कलेक्शन आणि बरंच काही... बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती... कोण आहे 'ती'?

बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडे गडगंज संपत्ती; भारतातच नाही तर, परदेशातही भव्य बंगला
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:08 PM

मुंबई | झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड रॉयल आयुष्य जगत असतात. सेलिब्रिटींची कोट्यवधींची प्रॉपर्टी, कार कलेक्शन, भव्य घर इत्यादी महागड्या गोष्टींमुळे सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. शिवाय सेलिब्रिटी त्यांच्या लाईफस्टाईलमुळे देखील कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गडगंज संपत्तीची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीची संपत्ती फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रा पार देखील आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोनम कपूर आहे. सोनम गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोनम कपूर बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता सोनमच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. अनेक महागड्या वस्तूंची सोनम मालकीण आहे.

दिल्लीतील पृथ्वीराज रोडवर सोनम आणि अभिनेत्रीचा पती आनंद आहूजा यांचा आलिशान बंगला आहे. सोनम आणि आनंद यांच्या बंगल्याची किंमत जवळपास १७३ कोटी रुपये आहे. फक्त दिल्लीमध्येच नाही तर, लंडनमध्ये सोनम आणि आनंद यांचा भव्य बंगला आहे. अभिनेत्री कामय बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते..

हे सुद्धा वाचा

sonam kapoor

भव्य घर, बंगल्यांशिवाय अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. अभिनेत्रीकडे मर्सिडीज कार आहे. अभिनेत्रीच्या भव्य कारची किंमत जवळपास १.७० कोटी रुपये आहे. मर्सिडीज शिवाय अभिनेत्रीकडे बीएमड्ब्ल्यू, ऑडी ए6 आणि ऑडी क्यू7 देखील आहे.

भव्य घर, बंगले, कार यांशिवाय अभिनेत्रीकडे महागडे दागिने देखील आहेत. अभिनेत्रीने साखरपुड्यात सर्वात महागडी आंगठी घातली होती. सोनमने साखरपुड्यात तब्बल ९० लाख रुपयांची आंगठी घातली होती. अभिनेत्रीचं लग्न देखील मोठ्य थाटात झालं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

सोनम कपूरचा पती आनंद स्नीकर बुटिक व्हेडनॉनव्हेजचा मालक आहे. याशिवाय आनंद क्लोदिंग कंपनी ‘भाने’ देखील निर्माता आहे. सोनम आता पती आनंद याच्यासोबत व्यवसाय वाढवत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोनम कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. सोनम पती आणि मुलगा वायूसोबत कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. पण अभिनेत्रीने लेकासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.