सोनम कपूरने इतक्या कमी किंमतीत का विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट?
मुंबईतील आलिशान फ्लॅट विकून सोनम कपूरला मोठा तोटा; इतक्या कमी किंमतीत अभिनेत्रीने विकला फ्लॅट
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. सोनम पती आणि मुलगा वायूसोबत उत्तराखंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्रीपचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अशात अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल एकल मोठी बातमी समोर येत आहे. सध्या रियल इस्टेट मार्केटमध्ये सोनम कपूर चर्चेत आहे. सोनमने मुंबईच्या बीकेसीमध्ये असलेला स्वतःचा फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट अभिनेत्रीने २०१५ मध्ये खरेदी केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार सोनमने २०१५ मध्ये बीकेसीतील फ्लॅट ३२.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. पण मुंबईतील आलिशान फ्लॅट विकून अभिनेत्रीला फार कमी नफा झाला हे. सोनमने मुंबईतील भव्य फ्लॅट फक्त ३२.५० कोटी रुपयांमध्ये विकला आहे. २०१५ साली खेरदी केलेला फ्लॅट विकून अभिनेत्रीला जवळपास फक्त १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
ज्या व्यक्तीने सोनमचा फ्लॅट खरेदी केला आहे, त्या फ्लॅटमध्ये मालकाला अनेक सुविधांचा फायदा झाला आहे. मालकाला फ्लॅट खरेदी केल्यामुळे चार पार्किंगची जागा मिळाली आहे. एवढंच नाही, तर सोनमने फ्लॅटचा वापर फार कमी केला होता. फ्लॅट विकल्यामुळे सोनम तुफान चर्चेत आहे.
View this post on Instagram
Squarefeatindia चे संस्थापक वरुण सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरने विकलेला फ्लॅट बीकेसीमध्ये आहे. या परिसरात शांतता असते. हा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनमचा फ्लॅट खरेदी केलेल्या व्यक्तीने १.९५ कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे.
सोनम कपूनच्या आधी अभिनेत्री जान्हवी कपूनने देखील फ्लॅट विकला होता. जान्हवीने तिचा फ्लॅट अभिनेता राजकुमार रावला ४४ कोटी रुपयांमध्ये विकला. फ्लॅट विकून आलेले पैसे अभिनेत्रीने दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवले. ज्याची किंमत ६५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं.
वडील बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांनी मिळून ६५ कोटी रुपयांमध्ये नवं घर खरेदी केलं. अभिनेत्रीचं घर वांद्रे येथील पश्चिम पाली हिल याठिकाणी आहे.