AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nayanthara | लग्नानंतर नयनताराने अभिनय सोडण्याचा घेतला निर्णय? समोर आलं निर्णयामागील खरं कारण

नयनताराचा प्रतीक्षेत असलेला सर्वांत मोठा चित्रपट म्हणजे 'जवान'. यामध्ये ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. अटली याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nayanthara | लग्नानंतर नयनताराने अभिनय सोडण्याचा घेतला निर्णय? समोर आलं निर्णयामागील खरं कारण
नयनतारा
| Updated on: Feb 24, 2023 | 9:29 AM
Share

चेन्नई : ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा अभिनयविश्व सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खासगी आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. नयनताराने प्रियकर विग्नेश शिवन याच्याशी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत. आता या मुलांची देखभाल करण्यासाठी तिने करिअरमधून दोन पावलं मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनयातून ब्रेक घेऊन ती मुलांकडे आणि पतीच्या प्रॉडक्शन हाऊसकडे लक्ष देणार असल्याचं कळतंय. नयनताराचा पती विग्नेश शिवन हा दिग्दर्शकसुद्धा आहे आणि पत्नीसोबत मिळून त्याने ‘रावडी पिक्चर्स’ या निर्मिती कंपनीची स्थापना केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिचा हा निर्णय ऐकून चाहते नाराज झाले आहेत. असं असलं तरी नयनताराचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तिचे काही पूर्ण केलेले आणि शूटिंग झालेले चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नयनताराचा प्रतीक्षेत असलेला सर्वांत मोठा चित्रपट म्हणजे ‘जवान’. यामध्ये ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. अटली याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत.

नयनताराच्या करिअरमधील 75 वा चित्रपट ‘लेडी सुपरस्टार 75’ याचीसुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निलेश कृष्णाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय पती विग्नेश शिवनने दिग्दर्शित केलेले आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी अल्फोन्से पुथरेन यांच्या ‘पाट्टू’ या चित्रपटात ती फहाद फासिलसोबत काम करणार आहे. तर AK 62 या चित्रपटात ती अजित कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिने पुरी जगन्नाथ यांचा ‘ऑटो जानी’ हा चित्रपटसुद्धा साइन केल्याचं समजतंय. त्यामुळे एकानंतर एक असे काही तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

2015 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.