भीमना अमावस्येला अभिनेत्रीने पतीच्या पायांना स्पर्श करत केली पूजा; ट्रोलर्सना म्हणाली “हे सर्व दिखाव्यासाठी..”

गेल्या वर्षी जेव्हा प्रणितीने सोशल मीडियावर भीमना अमावस्येनिमित्त असाच फोटो पोस्ट केला होता, तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. म्हणूनच यावेळी फोटो पोस्ट करतानाच तिने या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ही पूजा आपल्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची असल्याचं प्रणिताने या पोस्टद्वारे सांगितलं आहे.

भीमना अमावस्येला अभिनेत्रीने पतीच्या पायांना स्पर्श करत केली पूजा; ट्रोलर्सना म्हणाली हे सर्व दिखाव्यासाठी..
Pranita SubhashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 10:19 AM

बेंगळुरू | 19 जुलै 2023 : दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाषने 17 जुलै रोजी भीमना अमावस्येनिमित्त पूजा-अर्चना केली. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रणिताने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला असून ती पतीच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसतेय. यावरून ट्रोलिंग होण्याआधीच प्रणिताने फोटोच्या कॅप्शनमध्ये काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. तिच्यासाठी या सर्व गोष्टींचं काय महत्त्व आहे, हेदेखील तिने सांगितलं आहे.

प्रणिता सुभाषची पोस्ट-

‘भीमना अमावस्येनिमित्त सकाळी पूजा-अर्चना केली. तुमच्यासाठी हे सर्व पितृसत्ताकतेचा दिखावा वाटू शकतो (मागील वर्षी मी जे काही मीम्सचे पेजेस आणि माझ्या फोटोवून झालेला वाद पाहिला त्यावरून हे स्पष्ट करतेय), पण माझ्यासाठी हे सर्व खूप महत्त्वाचं आहे. सनातन धर्मात बहुतांश कर्मकांड का महत्त्वाची आहेत यामागे एक कथा आहे. हिंदूंच्या विधी पितृसत्ताक आहेत, असा युक्तिवाद करणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण हे सर्व अशा काही श्रद्धांपैकी एक आहे, जिथे देवींचीही समान पूजा केली जाते’, असं प्रणिताने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

प्रणिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘इतकी मॉडर्न असूनही सर्व परंपरा योग्यरित्या पाळतेस, तुझ्याविषयीचा आदर द्विगुणीत झाला’, असं एकाने लिहिलं. तर आपला धर्म पाळण्यात गैर काहीच नाही, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

गेल्या वर्षी जेव्हा प्रणितीने सोशल मीडियावर भीमना अमावस्येनिमित्त असाच फोटो पोस्ट केला होता, तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. म्हणूनच यावेळी फोटो पोस्ट करतानाच तिने या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ही पूजा आपल्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची असल्याचं प्रणिताने या पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधीमागे काही ना काही अर्थ असतो, देखील तिने अधोरेखित केलं आहे.

प्रणिताने 2021 मध्ये बिझनेसमॅन नितीन राजूशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. मुलीचं नाव अर्णा असं आहे. प्रणिताने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा 2’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. हा तिचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. याशिवाय अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....