पुष्पा सिनेमानं अल्लू अर्जुनला कसं बनवलं ‘सुपरस्टार अल्लू अर्जुन’, जाणून घ्या…

पुष्पाची भूमिका करणारा अल्लू अर्जुनही तरूणाईला भूरळ घालतोय. तो तरूणांचा स्टाईल आयकॉन बनलाय. या सिनेमानं अल्लू अर्जुनला देशव्यापी ओळख दिली. तो 'सुपस्टार' बनला.

पुष्पा सिनेमानं अल्लू अर्जुनला कसं बनवलं 'सुपरस्टार अल्लू अर्जुन', जाणून घ्या...
अल्लू अर्जुन
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:15 PM

मुंबई: सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचं भारतीय सिनेरसिकांच्या मनावर गारुड आहे. दक्षिण भारतीय सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला करण्याबरोबरच हे सिनेमे सिनेरसिकांच्या मनात घर करत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या नुकताच रिलीज झालेला आणि मोठ्या स्क्रीनवर दिमाखात मिरवणारा सिनेमा पुष्पा (pushpa the rise). पुष्पाने चाहत्यांच्या मनात घर करण्याचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड मोडलेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण हा सिनेमा फक्त दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर देशभर या सिनेमाची चर्चा आहे. आणि सिनेमानं अभिनेता अल्लू अर्जुनला  (allu arjun ) ‘द अल्लू अर्जुन’ बनवलं. जाणून घेऊयात या सिनेमानं अल्लू अर्जुनला सुपरस्टार कसं बनवलं ते…

पुष्पा हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केलाय. या सिनेमासोबतच 83 हा बॉलीवूडचा एक मोठा सिनेमादेखील प्रदर्शित झाला होता. भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपची ती गोष्ट होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसारखी मोठी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमालाही मागे टाकत पुष्पाने आपल्या विजयाचा झेंडा रोवला. यातलं अल्लू अर्जूनने साकारलेलं ‘पुष्पा’ हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं. त्याची स्टाईल. त्याचे डायलॉग सगळंच लोकांच्या मनाला भावलं आणि अल्लू अर्जुन फक्त दक्षिणेचा हिरो नाही तर तो देशाचा सुपरस्टार बनला. त्याच्या या यशात सिनेमाची गोष्टही तितकीच महत्वाची आहे.

सिनेमाची गोष्ट काय आहे? ‘पुष्पा’ हा सिनेमा लाल चंदनाच्या (Red Sandalwood) तस्करीवर बेतलेला आहे. या चित्रपटाची कथा लाल चंदन, त्याची तस्करी आणि पुष्पाची हुशारी यावर आधारित आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेलं लाल चंदन फक्त आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा, चित्तूर आणि नेल्लोर जिल्ह्यामध्ये सापडतं. पण या चंदनाला परदेशात मोठ्या प्रामाणावर मागणी असल्याने त्याची तस्करी केली जाते. याभोवतीच हा सिनेमा फिरतो.

अल्लू अर्जूनची भूमिका

एका सर्वसामान्य कामगारापासून ते त्या भागातला मोठा तस्कर होण्यापर्यंतचा पुष्पाचा प्रवास विशेष आहे. त्यासाठी त्याला येणाऱ्या अडचणी, सोसाव्या लागलेल्या गोष्टी यामुळे पुष्पाची भूमिका महत्वाची ठरते. त्याचं एका सामान्य मुलीवर जडलेलं प्रेम या सिनेमाला अधिक रंजक करतो.

पुष्पाचे डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड

‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है मैं…’ या डायलॉगने तर अख्खा सोशल मीडिया व्यापलाय. या डायलॉगवर सध्या रील्स बनवले जाताहेत. ते रील्स ट्रेंडिंग आहेत. ‘पुष्पा… पुष्पराज… मैं झुकेगा नही साला…’ हा डायलॉग तर तरूणाईच्या मनामनात आहे. थोडक्यात काय तर सिनेमाचे चांगलेच डायलॉग भाव खाताहेत.

पुष्पाची गाणी

पुष्पा चित्रपटातील गाणी सध्या ट्रेंडींग आहेत. ‘श्रीवल्ली’ या गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ‘सामी’ गाण्याचे रील्स सोशल मीडियावर गाजत आहेत. ‘ओ अनटावा’ या गाण्यावर डान्स करून अनेकजण रील्स बनवत आहेत. ‘ओ बोलेगा या, ओ ओ बोलेगा’ हे आयटम सॉगही सध्या चांगलंच गाजतंय.

View this post on Instagram

A post shared by Devisriyash (@devisriyash)

अल्लू अर्जुनची हवा

सध्या तरूणाई पुष्पाचे डायलॉग रोजच्या जीवनातही वापरतेय. त्याचे डायलॉग, त्याची स्टाईल कॉपी केली जातेय. थोडक्यात काय तर पुष्पा सध्या सगळ्यांच्या मनामनात आहे. आणि पुष्पाची भूमिका करणारा अल्लू अर्जुनही तरूणाईला भूरळ घालतोय. तो तरूणांचा स्टाईल आयकॉन बनलाय. या सिनेमानं अल्लू अर्जुनला देशव्यापी ओळख दिली. तो ‘सुपस्टार’ बनला.

संबंधित बातम्या

Celebs Corona Positive :साऊथ सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी

Republic Day 2022: ‘ए मेरे वतन के लोगों’ पासून ‘ये देश है वीर जवानों का’ ही सहाबहार गाणी तुम्ही ऐकली आहेत का ?

PHOTO | Baby Shower : आदित्य नारायणने पत्नी श्वेतासाठी दिली खास बेबी शॉवर पार्टी, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.