Rajinikanth: रजनीकांत घेणार संन्यास? एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ, चाहते नाराज

चाहत्यांचे लाडके रजनीकांत झगमगत्या विश्वापासून होणार दूर, सुपरस्टार घेणार संन्यास? सेलिब्रिटीच्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रजनीकांत यांचीच चर्चा...

Rajinikanth: रजनीकांत घेणार संन्यास? एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ, चाहते नाराज
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 1:24 PM

मुंबई : ‘कि सी भी ची ज की का मया बी में सा थ तो बहुत लो ग देते हैं, लेकि न उसकी वजह बनता है एक दुश्मन’, ‘हर पैदा हो ने वा ले को मरते वक्त कफन पहनना पडा है, वैसे ही हर का ले धंधे करने वा ले को हथकडी पहननी पडी है…’ असे एकापेक्षा एक डायलॉग बोलत सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं… आयुष्यात खस्ता खाल्लेल्या रजनीकांत यांनी स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.. महत्त्वाचं म्हणजे साऊथमध्ये रजनीकांत यांना पूजलं जातं. त्यांच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आजही असतात. रजनीकांत यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं कळाल्यानंतर चित्रपटगृहा बाहेर चाहत्यांचा वेगळाच उत्साह असतो. पण आता रजनीकांत यांच्याबद्दल अशी चर्चा रंगत आहे ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) द्वारे दिग्दर्शित त्यांच्या १७१ व्या सिनेमात झळकल्यानंतर सिनेविश्वाचा संन्यास घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. दिग्दर्शक मॅसस्किन याने मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सुपरस्टारचे चाहते नाराज झाले आहेत.

दिग्दर्शक लोकेश कनगराज याच्यासोबत रजनीकांत यांचा शेवटाचा सिनेमा असू शकतो…असं मॅसस्किन याने मुलाखतीत म्हटलं आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीत चर्चांना उधाण आलं आहे. दिग्दर्शकाची ही टिप्पणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे रजनीकांतच्या अनेक चाहत्यांनी यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

रजनीकांत यांचे चाहते म्हणाले, ‘थलाईवा असं करू शकत नाही…’ रजनीकांत यांनी यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे सुपरस्टारने घोषणा केल्यानंतर त्यावर विश्वास ठेवू असं देखील रजनीकांत यांचे चाहते म्हणाले आहेत. ७२ वर्षीय सुपरस्टार रजनीकांत ‘जेलर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमा १० ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे..

‘जेलर’ सिनेमाशिवाय रजनीकांत मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शित ‘लाल सलाम’मध्येही दिसणार आहेत. ‘लाल सलाम’ सिनेमानंतर रजनीकांत लोकेश कनगराज याच्याद्वारे दिग्दर्शित ‘थलाइवर 171’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रजनीकांत यांची चर्चा आहे. त्यामुळे रजनीकांत सिनेविश्वातून संन्यास घेणार की नाही.. हे अद्याप समोर आलेलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.