Kannada Filmmaker Pradeep Raj Passed Away : कन्नाड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचं निधन, कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव चित्रपट निर्माते प्रदीप राज (Pradeep Raj) यांचं निधन झालंय. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. आज ( गुरुवार) पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुद्दुचेरीत अंत्यसंस्कार केले […]
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव चित्रपट निर्माते प्रदीप राज (Pradeep Raj) यांचं निधन झालंय. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. आज ( गुरुवार) पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पुद्दुचेरीत अंत्यसंस्कार केले जाणार
प्रदीप राज यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही. प्रदीप यांच्यावर आज पुद्दुचेरीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हिट चित्रपटांची मालिका
‘किच्चू’ हा चित्रपट प्रदीप राज यांच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. त्याचसोबत ‘गिरगटले’ ‘किराताका’ ‘होटी उरिवा किच्चिनल्ली’ यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं.
दक्षिणेतील ‘हिरो’ यशसोबतचे सुपरहिट सिनेमे
दक्षिणेतील अभिनेता यशसोबत एकहून एक हिट सिनेमे दिले. ‘किराताका’ या तमिळ चित्रपटाचा त्यांनी रिमेक केला. ‘किराताका’ या सिनेमांनी अनेक नावाजलेले पुरस्कार आपल्या नावे केले. प्रदीप यांचा ‘किच्चू’ हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमाही चांगलाच हिट झाला. या सिनेमातील अभिनेता ध्रुव शर्मा यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं.
संबंधित बातम्या