Sridevi Love Story : श्रीदेवी ज्याला भाऊ म्हणत होती, त्याच्यासोबतच काही दिवसांत सुरु केली लव्हस्टोरी
श्रीदेवी जेव्हा प्रेग्नेंट झाली, तेव्हा सर्वांना धक्का बसला, कारण ज्याला भाऊ म्हणत होती, त्यानेच श्रीदेवीसोबत संसार थाटण्याची तयारी सुरु केली...
Sridevi – Boney Kapoor Love Story : बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज आपल्यात नाही, पण तिचं अभिनय आणि सौंदर्य कायम चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. आज श्रीदेवीच्या निधनाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तरी देखील अनेक महत्त्वाच्या दिवशी श्रीदेवीची आठवण चाहत्यांना आणि कुटुंबियांनी येत असते. ज्याप्रमाणे श्रीदेवीचं बॉलिवूड करियर चर्चेत राहिलं. त्यांचप्रमाणे निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत श्रीदेवीची लव्हस्टोरी तुफान गाजली. आज श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. बोनी कपूर यांचं श्रीदेवीसोबत दुसरं लग्न होतं. (Sridevi Love Story)
बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर असं होतं. आता मोना देखील या जगात नाहीत. मोना आणि श्रीदेवी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणून मोना यांनी श्रीदेवीला आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली. तेव्हा श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती एकमेकांना डेट करत होते आणि बोनी पहिली पत्नी मोना यांच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत होते.
पण बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यामध्ये खास नातं आहे, असा संशय मिथुन यांना आला. त्यानंतर मिथुन यांच्या विश्वास बसण्यासाठी श्रीदेवीने बोनी यांना राखी बांधली. पण तरी देखील श्रीदेवी आणि मिथुन यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Sridevi fall in love with Boney Kapoor)
जेव्हा बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची ओळख झाली, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतंही नातं नव्हतं. पण ‘मिस्टर इंडिया’ सिनेमानंतर दोघे एकमेकांच्या फार जवळ आले. बोनी कपूर जेव्हा श्रीदेवीकडे सिनेमासाठी ऑफर घेवून गेले, तेव्हा त्यांनी अभिनेत्रीपुढे आपल्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या. (sridevi first husband)
‘मिस्टर इंडिया’ सिनेमानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मोना कपूर यांनी दोघांच्या मैत्रीची काहीही अडचण नव्हती, कारण श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी बांधली होती. पण जेव्हा श्रीदेवी यांच्या प्रेग्नेंसीबद्दल मोना यांनी कळालं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
अखेर १९९६ मध्ये बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत मंदीरात लग्न केलं. श्रीदेवीने बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला टीकेचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, श्रीदेवी यांना घर तोडणारी म्हणून टॅग देखील देण्यात आला.
बोनी कपूर यांच्यासोबत लग्न झाल्यनंतर श्रीदेवीने जान्हवी कपूर हिला जन्म दिला. जान्हवी आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. तर श्रीदेवीची दुसरी मुलगी खूशी कपूर हिने देखील अभिनय विश्वात पाय ठेवला आहे. झोया अख्तर यांच्या ‘द अर्चिस’ सिनेमातून खूशी अभिनयास सुरुवात करणार आहे.