बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी निधनानंतर सोडून गेले कोट्यवधींची संपत्ती, आकडा जाणून व्हाल अवाक्
Bollywood celebs: 'हे' सेलिब्रिटी निधनानंतर मागे सोडून गेले कोट्यवधींची संपत्ती, तिसऱ्या सेलिब्रिटीच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क, सेलिब्रिटी यांचं निधन झालं असलं तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत
झगमगत्या विश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या निधनानंतर देखील चाहते विसरू शकलेले नाही. सेलिब्रिटी जिवंत नसले तरी, आजही त्यांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींनी अखेरचा श्वास घेतला पण कुटुंबासाठी मात्र कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले. अशाच काही दिवंगत सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी कुटुंबियांसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडली आहे.
अशा सेलिब्रिटींमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री श्रीदेवी यांचं आहे. 2018 मध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला, तर कुटुंबियांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण श्रीदेवी निधनानंतर कुटुंबियांसाठी कोट्यवधी रुपये मागे सोडून गेल्या. श्रीदेवी यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, 247 कोटी रुपयांची संपत्ती श्रीदेवी मागे सोडून गेल्या आहेत.श्रीदेवी यांना दोन मुली आहेत.
View this post on Instagram
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने देखील फार लवकर अखेरचा निरोप घेतला. निधनानंतर अभिनेत्याने कुटुंबियांसाठी जवळपास 59 कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडली आहे. एवढंच नाहीतर, महागड्या गाड्या देखील अभिनेत्याकडे होत्या. 20 जून 2020 मध्ये अभिनेत्याने स्वतःला संपवलं.
View this post on Instagram
अभिनेत्री ऋषी कपूर यांनी देखील कुटुंबियांसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडली आहे. 300 कोटी रुपयांची संपत्ती ऋषी कपूर यांनी कुटुंबियांसाठी ठेवली आहे. सांगायचं झालं तर, कपूर कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. कोरोना काळात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते ओमपुरी यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील ओमपुरी यांना डोक्यावर घेतलं. पण त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. ओमपुरी निधनानंतर कुटुंबियांसाठी 151 कोटी रुपयांची संपत्ती सोडून गेले आहेत.