स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

या नव्या मालिकेत ईशा केसकर आणि अक्षर कोठारीची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ईशाचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आता नव्या वेळेत प्रसारित होणार आहे.

स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Akshar Kothari Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 3:01 PM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | स्टार प्रवाहवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या लोकप्रिय आहेत. या मालिका प्रेक्षक वेळ न चुकवता पाहतात आणि चुकल्यास नंतर ओटीटीवर ती पाहण्याची संधी सोडत नाहीत. अशातच एखाद्या मालिकेला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत असेल, तर ती मालिका बंद करण्यात येते आणि त्याजागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये ईशा केसकर आणि अक्षर कोठारी अशी नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरून निरोप घेणारी ही मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात या मालिकेला अपयश आलं. त्याचाच परिणाम टीआरपीवर झाल्याने आता ही मालिका बंद करण्यात येत आहे. त्याच्या जागी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंध रेशमाचे’, ‘छोटी मालकीण’, ‘स्वाभिमान’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी या मालिकेतून नव्या रुपात समोर येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत अक्षर हा अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेती अद्वैत हा बिझनेसमन आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतोय. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही. अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, “स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका भेटीला येतेय. स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे. इशा केसकरसोबत मी पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली.” लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका येत्या 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.