Stranger Things 4 च्या एका एपिसोडच्या खर्चात बनू शकतात अनेक हिंदी चित्रपट; बजेट ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील!

प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी प्रॉडक्शन कंपनीने प्रत्येक एपिसोडवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. स्ट्रेंजर थिंग्स 4 च्या बजेटचा आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

Stranger Things 4 च्या एका एपिसोडच्या खर्चात बनू शकतात अनेक हिंदी चित्रपट; बजेट ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील!
Stranger Things 4Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 2:20 PM

मुंबई: नेटफ्लिक्सवरील ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या वेब सीरिजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत या सीरिजचे चार सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चारही सिझन्सना ओटीटी युजर्सकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या वेब सीरिजचा बजेटसुद्धा तगडा आहे. प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी प्रॉडक्शन कंपनीने प्रत्येक एपिसोडवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. स्ट्रेंजर थिंग्स 4 च्या बजेटचा आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

बॉलिवूडचा एखादा सर्वसाधारण चित्रपट हा 30 ते 40 कोटी रुपयांमध्ये बनतो. उत्तम कथानक आणि कलाकारांचं दमदार अभिनय असेल तर जेमतेम प्रमोशन करूनही असा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकतो. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडवर याहून कितीतरी अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, स्ट्रेंजर थिंग्स 4 च्या एका एपिसोडसाठी 30 दशलक्ष डॉलर म्हणजेच 242.93 कोटी रुपये खर्च करण्यात आले. वेब सीरिजच्या एका एपिसोडसाठी इतके पैसे खर्च करणं ही खूप मोठी बाब आहे. एका सिझनमध्ये एकूण ९ एपिसोड्स आहेत. त्या हिशोबाने या वेब सीरिजच्या सर्व एपिसोड्सचा बजेट जवळपास 2185 कोटी रुपये इतका होतो.

हे सुद्धा वाचा

या वेब सीरिजवर जितके पैसे खर्च केले जात आहेत, तितकेच पैसे त्यातील कलाकारांवरही खर्च केले जात आहेत. या सीरिजचा पहिला एपिसोड जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या पहिल्या एपिसोडचं बजेट हे 6 दशलक्ष डॉलर इतकं होतं. चौथ्या सिझनपर्यंत हा आकडा वाढून 30 दशलक्षांपर्यंत गेला. एखाद्या वेब सीरिजसाठीचा हा सर्वाधिक बजेट असल्याचं म्हटलं जात आहे.

स्ट्रेंजर थिंग्सचा पाचवा आणि शेवटचा एपिसोडसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या पाचव्या एपिसोडसाठीचा बजेट त्याहून अधिक असेल, यात काही शंका नाही. या पाचव्या सिझनमधील कलाकारांचा एकून बजेट हा 80 दशलक्ष डॉलर असल्याचं कळतंय.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....