‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’, ‘सुभेदार’ सिनेमातील देखणं पोस्टर प्रदर्शित

स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे आपल्या संसाराचेही भान नसणारे 'सुभेदार' तानाजी मालुसरे; सिनेमातीन नवीन पोस्टर प्रदर्शित.... सोशल मीडियावर 'सुभेदार' सिनेमाची चर्चा

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं', 'सुभेदार' सिनेमातील देखणं पोस्टर प्रदर्शित
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 8:54 PM

मुंबई | इतिहासात असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. अशाच असंख्य मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे….‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ सिनेमानंतर ‘सुभेदार’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २५ ऑगस्ट रोजी ‘सुभेदार’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र ‘सुभेदार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘सुभेदार’ सिनेमात सुभेदार तानाजी मालुसरे यांचं भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा सिनेला ५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर देखील सिनेमाची तुफान चर्चा रंगत आहे.

काही दिवसांपू्र्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता सिनेमातील एक देखणं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर कोणताही विचार न करता तानाजी मालुसरे यांनी आपलं वचन पूर्ण केलं.

महत्त्वाचं म्हणजे शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही तितकीच मोलाची साथ दिली. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत तानाजी मालुसरे यांनी मोहीम फत्ते केली. आता प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांचं पूर्ण कुटुंब दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘सुभेदार’ सिनेमातील नवीन पोस्टर तुफान व्हायरल होत आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखण दिग्पाल लांजेकरच्या (digpal lanjekar) यांनी सोशल मीडियावर पोस्टर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये ‘रनांगनात आमी न्हाई लढत.. परत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं, असं धीराचं बोलंच लढत असत्यात…’ असं लिहिलं आहे. दिग्पाल लांजेकरच्या यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अभिनेते अजय पुरकर हे ‘सुभेदार’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय पुरकर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा बद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.