Marathi News Entertainment Suhana Khan appears to drop F bomb at Ishan Kishan during KKR IPL game watch video of her outburst
Video | इशान किशन बाद होताच सुहाना खानच्या तोंडून निघाला ‘तो’ शब्द; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आठव्या षटकात जेव्हा तो बाद झाला, तेव्हा केकेआरच्या सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. यावेळी मॅचच्या टेलिकास्टदरम्यान स्टँडवर उभ्या असलेल्या सुहानाकडे कॅमेरा फिरला.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याआधी ती ‘मेबलिन’ या ब्युटी प्रॉडक्ट्सची ब्रँड ॲम्बेसेडरसुद्धा झाली आहे. त्यामुळे सुहाना जिथे जाईल, तिथे लक्ष वेधून घेते. रविवारी ती वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सची मॅच पाहण्यासाठी गेली होती. आयपीलमध्ये केकेआरची ही मॅच मुंबई इंडियन्सविरुद्ध होती. मुंबईत पार पडणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना ती आवर्जून हजेरी लावते. नेहमीप्रमाणे ती रविवारीसुद्धा स्टँडमध्ये उभं राहून आपल्या टीमला पाठिंबा देताना दिसली. मात्र यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
कोलकाताने मुंबईला 186 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरच्या गोलंदाजांना मुंबईचा सलामीवीर इशान किशनविरोधात यश मिळत नव्हतं. इशान किशनने पॉवरप्लेमध्येच कोलकात्याच्या हातातून सामना घालविण्यासाठी वेगवान 58 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे आठव्या षटकात जेव्हा तो बाद झाला, तेव्हा केकेआरच्या सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. यावेळी मॅचच्या टेलिकास्टदरम्यान स्टँडवर उभ्या असलेल्या सुहानाकडे कॅमेरा फिरला. नेमकी त्याच वेळी तिने ‘F*** off’ असं म्हणताना दिसली. त्यानंतर कॅमेरा लगेचच मैदानाकडे फिरला. मात्र तोपर्यंत अनेकांनी सुहानाचा प्रतिसाद पाहिला होता.
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुहानाने अपशब्द वापरला म्हणून काहींनी तिच्यावर टीका केली. तर मॅच पाहताना तिचा हा उत्कट प्रतिसाद होता, असा बचाव सुहानाच्या चाहत्यांनी केला. सुहानाच्या या व्हिडीओवर सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
23 वर्षांची सुहाना झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘आर्चीज’ कॉमिक्समधील व्यक्तिरेखांवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून त्यात खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्याही भूमिका आहेत. खुशी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. तर अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांचा नातू आहे.