Suhana Khan | बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शाहरुखच्या लेकीचा जलवा; सुहाना बनली ब्रँड ॲम्बेसेडर

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सुहानाला आवर्जून पाहिलं जातं.

Suhana Khan | बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शाहरुखच्या लेकीचा जलवा; सुहाना बनली ब्रँड ॲम्बेसेडर
Suhana KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 8:25 AM

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच तिच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चेत असते. एकीकडे तिचा पहिलावहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असतानाच आता ती आणखी एका मोठ्या प्रोजेक्टशी जोडली गेली आहे. सुहाना खान आता न्यूयॉर्कच्या एका मोठ्या ब्रँडची ॲम्बेसेडर झाली आहे. नुकतीच ती या ब्रँडच्या कार्यक्रमाला पोहोचली होती. यावेळी सुहानाने तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केलं. ‘मेबलिन’ या ब्रँडची ती ॲम्बेसेडर झाली असून लाँच कार्यक्रमात तिने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता.

सुहानासोबतच बिझनेस विश्वातून अनन्या बिर्ला आणि मॉडेल एक्छा केरूंग या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे आणि स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसुद्धा तिथे हजर राहणार होत्या. मात्र काही कारणांमुळे या दोघी कार्यक्रमाला पोहोचू शकल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

सुहाना खान नुकतीच वडील शाहरुखसोबत आयपीएल टीम केकेआरला पाठिंबा देताना दिसली होती. इंडस्ट्रीतील तिची मैत्रिण शनाया कपूरसोबत ती कोलकातामध्ये सामना पाहण्यासाठी गेली होती. या वेळी दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुहाना लवकरच ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जोया अख्तरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सुहानाला आवर्जून पाहिलं जातं. सुहाना तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने अगस्त्याने कुटुंबीयांसमोर हे नातं ‘ऑफिशिअल’ करण्याचं ठरवलं होतं, अशीही चर्चा होती.

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील तीन स्टार किड्स पदार्पण करणार आहेत. सुहाना खान , श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे यातून पदार्पण करत आहेत.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.