Holi 2023 | होळीनिमित्त सुकेशने जॅकलिनसाठी लिहिलं प्रेम पत्र; म्हणाला ‘तुझ्या आयुष्यातील सर्व रंग..’

सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात सध्या जॅकलिन आणि नोरा या दोघींची चौकशी सुरू आहे. जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलं होतं, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.”

Holi 2023 | होळीनिमित्त सुकेशने जॅकलिनसाठी लिहिलं प्रेम पत्र; म्हणाला 'तुझ्या आयुष्यातील सर्व रंग..'
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:00 AM

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने दिल्लीतील तिहार तुरुंगातून एक पत्र लिहिलं आहे. माध्यमांसमोर आलेल्या या पत्रात सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सुकेशने या पत्रात जॅकलिनसाठी ‘हॅपी होळी’चा संदेश लिहिला आहे आणि तिचा उल्लेख सर्वांत चांगली व्यक्ती असा केला आहे. इतकंच नव्हे तर तिचं आयुष्य प्रेमाच्या रंगाने भरण्याचं आश्वासन त्याने या पत्रातून दिलं आहे.

होळीनिमित्त सुकेशचं जॅकलिनला प्रेमपत्र

सुकेशने त्याच्या या पत्रात लिहिलं आहे, ‘मी सर्वांत दमदार आणि अद्भुत व्यक्तीला.. माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांच्या या खास सणाच्या दिवशी मी तुला वचन देतो की तुझ्या आयुष्यातून जे रंग गायब झाले, ते मी 100 टक्क्यांनी पुन्हा भरेन. या वर्षी पूर्ण उत्साहात आणि माझ्या स्टाईलमध्ये मी तुला हे वचन देतो. माझी ती जबाबदारीसुद्धा आहे. तुला माहितीये, मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, बेबी. आय लव्ह यू बेबी, नेहमी हसत राहा. माझ्यासाठी तू किती महत्त्वाची आहेस हे तुला नीट ठाऊक आहे. माझ्या राजकुमारीला खूप प्रेम, तुझी खूप आठवण येते.’

तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले गेले होते. या दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर गंभीर आरोप केले होते. पिंकीच्या मदतीनेच सुकेश लोकांना फसवतो असा खुलासा जॅकलिन आणि नोराने केला होता. जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलं होतं, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.”

हे सुद्धा वाचा

सुकेशने पिंकी ईराणीमार्फत जॅकलिनशी संपर्क साधला होता. सुकेश हा गृहमंत्रालयाशी संबंधित असून तो सरकारसाठी काम करतो, अशी खोटी ओळख तिने जॅकलिनला करून दिली होती. इतकंच नव्हे तर “तो सन टीव्हीचा मालक आहे आणि जयललिता यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तुझा तो खूप मोठा चाहता आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बरेच प्रोजेक्ट्स त्याने तुझ्यासाठी आणले आहेत”, असं सांगून तिची जॅकलिनची फसवणूक केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.