प्रसिद्ध दिग्दर्शकांचं निधन; वयाच्या ५० व्य वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास
मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. भारतीय सिनेमाचे प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील यांनी ‘बंगलोर डेज’, ‘घजनी’ सोबतच अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आर्ट दिग्दर्शिक सुनील बाबू यांच्या निधनाची माहिती फिल्ममेकर अंजली मेनन यांनी दिली. ज्यानंतर पूर्ण इंडस्ट़्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे सूनील यांचं वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला सूज आली होती. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलगू, तमिळ आणि हिंदीमध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी साबू सिरिल यांचे सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि अनेक पुरस्कार मिळावले.
सूनील बाबू यांनी ‘सिंह इज किंग’, ‘एमएस धोनी’, ‘पा’, ‘लक्ष्य’, ‘स्पेशल 26’ यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सूनील फक्त साऊथ आणि बॉलिवूडसाठी मर्यादित न राहता त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील काम केलं. ‘रोज’ सिनेमासाठी त्यांनी हॉलिवूडमध्ये पाय ठेवला.
सूनील बाबू यांच्या निधनानंतर, अंजली मेनन, दुलकर सलमान यांसारख्या साऊथ सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी सुनील बाबू यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूनील बाबू यांच्या निधनीची चर्चा आहे.
View this post on Instagram
दुलकर सलमान इन्स्टाग्रामवर सूनील यांचा एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सूनील यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.