AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसले सनी देओल-डिंपल कपाडिया; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

80 च्या दशकात सनी देओल आणि डिंपल कपाडिया ही जोडी तुफान चर्चेत होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होत्या. आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी आणि डिंपल सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मुंबईतल्या एकाच क्लिनिकमधून बाहेर पडताना या दोघांना पाहिलं गेलंय.

एकाच क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसले सनी देओल-डिंपल कपाडिया; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Sunny Deol and Dimple KapadiaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : 15 डिसेंबर 2023 | एकेकाळी अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. 80 च्या दशकात सनी आणि डिंपलच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. सनी देओलची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अमृता सिंहनेही दोघांच्या नात्याचा खुलासा केला होता. आता इतक्या वर्षांनंतरही सनी आणि डिंपलची जोडी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांनाही मुंबईतल्या एका क्लिनिकमधून बाहेर पडताना पाहिलं गेलंय. पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट केला असून सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे.

सनी आणि डिंपल हे मुंबईतल्या एका डोळ्यांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. हे दोघं जरी वेगवेगळे क्लिनिकमध्ये गेले असले तरी एकाच ठिकाणी गेल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यावेळी सनी देओल पोलो टी-शर्ट आणि ट्राऊजर्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसला तर डिंपलने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सनी आणि डिंपलने ‘मंजिल मंजिल’, ‘अर्जुन’, ‘नरसिम्हा’ आणि ‘आग का गोला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

पहा व्हिडीओ

Dimple Kapadia and Sunny Deol spotted at Hospital byu/Pastlife2901 inBollyBlindsNGossip

सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही डिंपलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमधून बाहेर पडताना पापाराझींनी डिंपल कपाडियाचा व्हिडीओ शूट केला होता. मात्र पापाराझी आणि फोटोग्राफर्सकडे साफ दुर्लक्ष करत डिंपल थिएटरमधून बाहेर पडताच थेट कारमध्ये जाऊन बसली.

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी काही चित्रपटात बोल्ड सीन्ससुद्धा दिले होते. राजेश खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर डिंपल आणि सनी देओल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. जेव्हा डिंपलची बहीण सिंपल कपाडियाचं निधन झालं, तेव्हासुद्धा सनी देओल तिला सावरताना दिसला होता. जवळपास 11 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केल्याचं म्हटलं जातं.

सनी देओलने 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पूजाशी लग्न केलं. या चित्रपटात त्याने अमृता सिंहसोबत काम केलं होतं. सनी आणि पूजा यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी करण देओलने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड दृशा आचार्यशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.