Sunny Deol | सनी देओलच्या बंगल्याच्या लिलावासंदर्भात मोठी अपडेट; 24 तासांत बँकेनं बदलला निर्णय

बँकेनं रविवारी सांगितलं होतं की 'सनी व्हिला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुहू इथल्या या बंगल्याचा लिलाव 51.43 कोटी रुपयांपासून सुरू केला जाईल. तर लिलावाच्या बोलीची किमान रक्कम 5.14 कोटी रुपये ठेवण्यात आली होती.

Sunny Deol | सनी देओलच्या बंगल्याच्या लिलावासंदर्भात मोठी अपडेट; 24 तासांत बँकेनं बदलला निर्णय
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:06 AM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेण्यात आली आहे. बँक ऑफ बरोडाने एका निवेदनाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी लिलावाची प्रक्रिया पार पडणार होती. 56 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल यांचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. सनी देओल हे डिसेंबर 2022 पासून बँक ऑफ बरोडाच्या 55.99 कोटी रुपयांच्या कर्जाचे थकबाकीदार आहेत. ‘अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांच्या बंगल्याच्या विक्री संदर्भातील लिलावाची नोटीस काही तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आली आहे’, असं बँकेनं निवेदनात स्पष्ट केलं आहे.

बँकेनं रविवारी सांगितलं होतं की ‘सनी व्हिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुहू इथल्या या बंगल्याचा लिलाव 51.43 कोटी रुपयांपासून सुरू केला जाईल. तर लिलावाच्या बोलीची किमान रक्कम 5.14 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. या व्यतिरिक्त सनी साऊंड्स या 599.44 चौरस मीटरच्या मालमत्तेचाही लिलाव होणार होता. सनी साऊंड्स ही देओल कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी कर्जासाठी कॉर्पोरेट गॅरेंटर होती. तर सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र हे वैयक्तिक हमीदार आहेत.

रविवारी बजावलेल्या नोटिशीत असं म्हटलं गेलं होतं की, 2002 च्या SARFAESI कायद्याच्या तरतुदींनुसार लिलाव होण्यापासून रोखण्यासाठी देओल कुटुंबीय अजूनही बँकेकडे त्यांच्या थकित कर्जाची पुर्तता करू शकतात. बँकेनं लिलावासंदर्भातील नोटीस बजावल्यानंतर 24 तासांत आपला निर्णय बदलला आहे. ‘सनी व्हिला’ या बंगल्याच्या लिलावाला स्थगिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरत आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने हृतिक रोशनच्या ‘वॉर’, सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार केला आहे.

‘गदर 2’ची दुसऱ्या वीकेंडची कमाई-

  • शुक्रवार- 20.50 कोटी रुपये
  • शनिवार- 31.07 कोटी रुपये
  • एकूण- 336.20 कोटी रुपये

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.