Sunny Deol | “सडा हुआ बॉलिवूड…”; ड्रग्जच्या मुद्द्यावर सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

ऑक्टोबर 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्याआधी 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चाहत्यांनी इंडस्ट्रीवर बरेच आरोप केले.

Sunny Deol | सडा हुआ बॉलिवूड...; ड्रग्जच्या मुद्द्यावर सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 4:29 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड आणि ड्रग्ज यांविषयी अनेकदा बोललं जातं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचं ड्रग्जशी कनेक्शन जोडलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सनी देओलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड आणि ड्रग्ज या विषयावर तो मोकळेपणे व्यक्त झाला. सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ड्रग्जविषयी प्रश्न विचारण्यात आला.

काय म्हणाला सनी देओल?

“बॉलिवूड सडलेला नाही तर माणूसं सडलेली आहेत. ते कोणत्या क्षेत्रात नाहीत, ते मला सांगा. बिझनेसमन असेल, स्पोर्ट्समन असेल, ड्रग्जच्या नशेत धुंद असलेली लोकं सगळीकडेच आहेत. पण आम्ही ग्लॅमरवाले आहोत म्हणून आमच्यावर टीका करायला मजा येते”, असं सनी देओल म्हणाला.

ऑक्टोबर 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्याआधी 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चाहत्यांनी इंडस्ट्रीवर बरेच आरोप केले.

हे सुद्धा वाचा

याआधीही सनी देओलने बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्जच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “मी आयुष्यभर दारू, ड्रग्ज आणि पार्ट्यां यांपासून लांब राहिलो. मी मनापासून व्यायाम करतो आणि एका निश्चित शिस्तीचं पालन करतो. त्यामुळे मी निरोगी राहतो आणि दिसतो. इतक्या वर्षांत मला एक गोष्ट समजली की तुम्ही प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करू शकत नाही.”

सनी देओलच्या ‘गदर 2’ची उत्सुकता

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत.

शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'.