धर्मेंद्र यांच्यासाठी सनी देओलची पोस्ट, म्हणाला, ‘पापा मिसिंग यू…’, चाहते चिंतेत
Sunny Deol: धर्मंद्र यांच्यासाठी सनी देओल याची भावूक पोस्ट, अभिनेत्याची पोस्ट पाहून चाहते चिंतेत, फोटो पोस्ट करत म्हणाला, 'पापा मिसिंग यू...', सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या पोस्टची चर्चा...
Sunny Deol Social media Post: बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहत्यांमध्ये धर्मेंद्र यांची क्रेझ कायम आहे. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना धर्मेंद्र फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आता देखील अभिनेत सनी देओल याच्या पोस्टमुळे धर्मेंद्र यांची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, सनी देओल याने पोस्टसाठी लिहिल्या कॅप्शमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सनी देओल याने धर्मेंद्र यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. वडिलांचे फोटो पोस्ट करत अभिनेत्याने ‘पाप्पा तुमची खूप आठवण येत आहे…’ असं कॅप्शन लिहिलं आहे. अभिनेत्याचं कॅप्शन पाहून चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री ईशा देओल हिने देखील पोस्टवर कमेंट केली आहे.
सनी देओल याच्या पोस्टवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘धर्मेंद्र यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सनी देओल आणि बॉबी देओल यांना माझ्याकडून प्रेम…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आई-वडिलांशिवाय जग अधुरं आहे…’ सध्या सर्वत्र सनी देओल याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सनी देओल यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘गरद 2’ च्या यशानंतर अभिनेता ‘बॉर्डर 2’ आणि गोपीचंद मालिनेनी यांच्या ‘जाट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. वयाच्या 67 व्या वर्षी देखील सनी देओल बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र चाहत्यांना स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. शिवाय चाहत्यांसोबत आनंद देखील शेअर करतता.
धर्मेंद्र कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर धर्मेंद्र यांना 2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तर धर्मेंद्र फक्त 254 लोकांना सोशल मीडियावर फॉलो करतात.