‘गदर 2’च्या यशानंतर ‘बॉर्डर 2’ची जोरदार चर्चा; खुद्द सनी देओलने पोस्ट लिहित चाहत्यांना दिला धक्का!

जे. पी. दत्ता दिग्दर्शित आणि निर्मित 'बॉर्डर' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. जे. पी. दत्ता यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

'गदर 2'च्या यशानंतर 'बॉर्डर 2'ची जोरदार चर्चा; खुद्द सनी देओलने पोस्ट लिहित चाहत्यांना दिला धक्का!
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 8:23 AM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉलिवूड इंडस्ट्रीत नव चैतन्य आणलं आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहेत. गेल्या दहा दिवसांत सनी देओलच्या या चित्रपटाने कमाईचा 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर 2’च्या या प्रचंड यशानंतर आता सनी देओलच्या आणखी एका हिट चित्रपटाच्या सीक्वेलची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हा चित्रपट आहे ‘बॉर्डर’. गदर 2 नंतर सनी देओलने ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेलसुद्धा साइन केल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता खुद्द सनी देओलने उत्तर दिलं आहे.

जे. पी. दत्ता दिग्दर्शित आणि निर्मित ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. जे. पी. दत्ता यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, तब्बू, कुलभूषण खरबंदा, पूजा भट्ट, राखी यांसारख्या कलाकारांची मोठी फौजच होती. आता सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाविषयी होणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

सनी देओलची पोस्ट-

‘मी काही चित्रपट साइन केल्याच्या चर्चांना उधाण आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या मी फक्त गदर 2 या चित्रपटावर आणि त्यावर तुमच्याकडून होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावावर लक्ष केंद्रीत करत आहे. मी दुसरा कोणताच चित्रपट अद्याप साइन केला नाही. पण योग्य वेळी काहीतरी खास घोषणा नक्कीच करेन. तोपर्यंत तारा सिंगवर तुमच्या प्रेमाचा वर्षाव असाच होऊ द्या’, असं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जरी ‘बॉर्डर 2’चा सीक्वेल नसला तरी सनी देओलच्या या दुसऱ्या प्रोजेक्टच्या घोषणेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ची दुसऱ्या वीकेंडची कमाई-

शुक्रवार- 20.50 कोटी रुपये शनिवार- 31.07 कोटी रुपये एकूण- 336.20 कोटी रुपये

या चित्रपटाने हृतिक रोशनच्या ‘वॉर’, सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.