Sunny Deol | डिंपल कपाडियाच नाही तर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते सनी देओल यांचे ‘प्रेमसंबंध’
एक, दोन नाही तर, चार प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते सनी देओल यांचे 'प्रेमसंबंध', पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही कारण...
मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सनी देओल सध्या ‘गरद २’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. पण एका काळ असा होता, जेव्हा सनी देओल त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. फक्त अभिनेत्री डिंपल कपाडियाच नाही तर, बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत सनी देओल यांचे ‘प्रेमसंबंध’ होते. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सनी यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. विवाहित असताना देखील रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे सनी – डिम्पल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. जाणून घेवू कोणत्या अभिनेत्रींसोबत सनी देओल यांच्या नात्याच्या रंगल्या चर्चा…
अभिनेत्री डिंपल कपाडिया – सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. सिनेमात एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, सनी – डिम्पल यांनी लग्न देखील केलं होतं. पण सनी यांची पत्नी पूजा यांनी पतीला धमकी दिली.. डिम्पल हिच्यासोबत असलेलं नातं संपवलं नाही तर घटस्फोट घेत मुलांना घेवून निघून जाईल… अशी परिस्थिती ओढावल्यानंतर सनी यांनी देखील प्रेमाचा त्याग करत कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं.
अभिनेत्री अमृता सिंग – अभिनेता सैफ अली खान याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत देखील सनी देओल यांच्या नावाची चर्चा रंगली. एक काळ असा होता, जेव्हा सनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी अमृता तयार होत्या. पण अमृता यांच्या आईला दोघांचं नातं मान्य नव्हतं… एवढंच नाही तर, सनी देओल लग्न करत असल्याचं कळल्यानंतर अमृता यांना मोठा धक्का बसला..
अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री – हिच्यासोबत देखील सनी देओल यांनी स्क्रिन शेअर केली आहे. १९८८ दरम्यान दोघांचं नातं अधिक घट्ट झाल्याच्या देखील अनेक चर्चा रंगल्या. ‘दामिनी’ सिनेमानंतर दोघांच्या डेटींगच्या देखील चर्चा रंगल्या. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याच्या देखील अनेक चर्चा रंगल्या.
अभिनेत्री रवीना टंडन – रवीना आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा, रवीना हिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. अभिनेते सनी देओल यांच्यासोबत देखील रवीना यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली. ‘जिद्दी’ आणि ‘क्षत्रीय’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांचं नातं अधिक घट्ट झालं.. असं अनेकदा समोर आलं. पण दोघांनी कधी नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही.
एककाळ होता जेव्हा अभिनेते सनी देओल त्यांच्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत होते. पण आता सनी देओल आगामी सिनेमा ‘गरद २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण त्याच दिवशी अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. म्हणून कोणाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.