Gadar | बॉलिवूड ‘गदर’च्या विरोधात का होतं? 22 वर्षांनंतर सनी देओलने केला खुलासा

'गदर : एक प्रेम कथा' हा चित्रपट पुन्हा एकदा 9 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हासुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या तीन दिवसांत ‘गदर’ने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Gadar | बॉलिवूड 'गदर'च्या विरोधात का होतं? 22 वर्षांनंतर सनी देओलने केला खुलासा
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 9:48 AM

मुंबई | 17 जुलै 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. आता सीक्वेलच्या प्रमोशननिमित्त सनी देओलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने ‘गदर’ चित्रपटाच्या यशाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. सुरुवातीला ‘गदर’ या चित्रपटाला स्वीकार करण्यास बॉलिवूड खूप घाबरत होता, असंही त्याने सांगितलं. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉलिवूडने पाठ फिरवली होती.

सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सनी देओल त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पोहोचला होता. त्याला तारा सिंगच्या अवतारात पाहून कॉमेडियन कपिल शर्मासुद्धा खुश झाला. जेव्हा कपिलने त्याला चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मनात असलेल्या भावनांविषयी विचारलं तेव्हा सनी देओल म्हणाला, “उत्साह तर आहेच पण भीतीसुद्धा आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा इंडस्ट्रीत प्रत्येकजण.. (हाताचा अंगठा खाली करत इशारा केला). मात्र प्रेक्षकांनी ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला, त्यामुळे सर्वकाही बदललं.”

हे सुद्धा वाचा

“जेव्हा गदर एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की तो इतका हिट होईल. लोक म्हणायचे की हा पंजाबी चित्रपट आहे, त्याला हिंदीमध्ये डब करा. काही चित्रपट वितरकांनी नकार दिला होता. आम्ही हा चित्रपट खरेदी करणार नाही असं ते म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. पण लोकांना हा चित्रपट इतका आवडला की नंतर त्यांनीच सर्वांचं तोंड बंद केलं”, असं सनी देओलने याआधीच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट पुन्हा एकदा 9 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हासुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या तीन दिवसांत ‘गदर’ने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. गेल्या 22 वर्षांपासून हा चित्रपट ऑनलाइन सर्वत्र उपलब्ध होता. मात्र तरीसुद्धा थिएटरमध्ये झालेली ही कमाई उल्लेखनीय आहे. बॉक्स ऑफिसच्या या आकड्यांवरून ‘गदर 2’विषयी प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे, हे पहायला मिळतंय.

‘गदर 2’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली. गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे. गदर 2 हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.