Sunny Deol | जेव्हा सनी देओलने काढली तरुणीची छेड; तिचे भाऊ थेट घरी पोहोचले अन्..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने हा किस्सा सांगितला. त्याने रस्त्यावरील एका तरुणीची छेड काढली आणि त्यानंतर जे काही घडलं ते सनी देओलने सविस्तर या मुलाखतीत सांगितलं.

Sunny Deol | जेव्हा सनी देओलने काढली तरुणीची छेड; तिचे भाऊ थेट घरी पोहोचले अन्..
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:11 PM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 600 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या यशानंतर सनी देओल विविध मुलाखती देऊन चित्रपटाचं प्रमोशन करताना आणि चाहत्यांचे आभार मानताना दिसतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एक जुना किस्सा सांगितला. सनी देओलने रस्त्यावरील एका तरुणीची छेड काढली होती आणि त्यानंतर तिचा भाऊ पाठलाग करत अभिनेत्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचला होता. यानंतर जे काही घडलं, तेसुद्धा सनी देओलने या मुलाखतीत सविस्तर सांगितलं.

सनी देओलने तरुणीची काढली छेड

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, “मी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी गाडीने जात होतो. त्यावेळी रस्त्यावर एका सुंदर तरुणीला मी पाहिलं. त्यावेळी तारुण्याच्या भरात मी तिला काही बोललो असेन. त्यानंतर मी जेव्हा मित्राच्या घरी पोहोचलो तेव्हा घराच्या दारावर कार थांबल्याचा आवाज आला. ज्या मुलीवर मी कमेंट केली होती, तिचा भाऊ आमचा पाठलाग करत घरी पोहोचला होता. त्यावेळी मला माझी चूक जाणवली.”

पुढे काय घडलं?

“मी लगेच त्या तरुणीच्या भावाची माफी मागितली. जर तुम्हाला मला मारायचं असेल तर खुशाल मारा. मी चुकलो. मी तुझ्या बहिणीसोबत चुकीचं वागलो, असं म्हणत मी मनापासून माफी मागितली. मी आधीपासून असाच आहे. जर मी चुकीचा असेन तर लगेच माफी मागून माझी चूक स्वीकारतो”, असं सनी देओलने पुढे सांगितलं. याच मुलाखतीत सनी देओलने सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

“माझा तसा वागण्याचा काहीच हेतू नव्हता. अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे मी दु:खी झालो पण मला पुढे चालत राहावं लागलं. अर्थातच चाहते तुमच्यावर प्रेम करतात आणि आम्हीसुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतो. अनेकदा सेल्फी क्लिक करून झाल्यानंतर ते तिथून हलत नाही. अशा वेळी एखादी व्यक्ती मला रेकॉर्ड करतेय याचा विचार मी करत नाही. मला पुढे जाऊ द्या, इतकाच विचार माझ्या डोक्यात असतो,” असं तो म्हणाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.