Sunny Deol | खासदार सनी देओल यांचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य

Sunny Deol | २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी खासदार सनी देओल यांचा मोठा निर्णय; सध्य सर्वत्र सनी देओल यांच्या निर्णयाची चर्चा... सनी देओल यांनी का घेतला एवढा मोठा निर्णय...

Sunny Deol | खासदार सनी देओल यांचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:37 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमाने प्रदर्शनानंतर ११ दिवसांत तब्बल ३८९.१० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. ‘गरद २’ सिनेमामुळे चर्चेत असताना सनी देओल यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही… असा निर्णय सनी देओल यांनी घेतला आहे. सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या निर्णयाची चर्चा रंगत आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक का लढवणार नाही याचं स्पष्टीकरण देखील सनी देओल यांनी दिलं आहे. सध्या सर्वत्र सनी देओल यांची चर्चा रंगत आहे.

सनी देओल म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणून काम करणं हीच माझी आता निवडणूक असणार आहे. एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करू अशी माझी इच्छआ आहे.. तुम्ही कायम एक काम करु शकता. एकत्र अनेक कामं करू शकत नाही. मी ज्या विचाराने राजकारणात प्रवेश केलं होतं, ते काम मी एक अभिनेता म्हणून देखील करु शकतो..’

पुढे सनी देओल म्हणाले, ‘मी एक अभिनेता म्हणून सर्वकाही करु शकतो. पण राजनीतीमध्ये एखादा शब्द दिला आणि काम पूर्ण करु शकलो नाही तर, मला अस्वस्थ होतं. मी असं करु शकत नाही. मी यापुढे एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करेल..’ असं स्पष्टीकरण देत सनी देओल यांनी त्यांच्या निर्णय चाहत्यांनी सांगितला आहे.

सनी देओल यांनी २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत, सनी यांनी पंजाबमधील गुरदासापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनतेनेही त्यांना निराश केलं नाही. गुरदासापूर येथील जनतेने ८४ हजारांहून अधिक मतांनी सनी देओल यांना विजयी केलं. पण आता सनी देओल यांनी २०२४ मधीव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाची कमाई

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाता सिक्वल ‘गदर २’ सिनेमा २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त करणाऱ्या सिनेमांपैकी ‘गदर २’ देखील एक सिनेमा आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगली आहे.

‘गदर २’ सिनेमाने अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. तर ‘गदर २’ सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.