AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | सलग ७ व्या दिवशी सनी देओल यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी, कामाईचा आकडा थक्क करणारा

Gadar 2 | बॉक्स ऑफिसवर सलग सातव्या दिवाशी अभिनेते सनी देओल स्टारर 'गदर २' सिनेमाचा बोलबाला; सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई...चित्रपटगृहात सनी देओल यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी...

Gadar 2 | सलग ७ व्या दिवशी सनी देओल यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी, कामाईचा आकडा थक्क करणारा
Gadar 2Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 18, 2023 | 7:55 AM
Share

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत. देशभरातील थिएटर्समध्ये सनी देओल यांच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या सातव्या दिवशीही अनेक शोज हाऊसफुल्ल आहेत. ‘गदर २’ सिनेमा प्रदर्शणाच्या पहिल्या दिवसापासून तुफान कमाई करताना दिसत आहे. आता सिनेमाच्या सातव्या दिवसाची कमाई देखील समोर आली आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. एवढंच नाही तर, सिनेमा काही दिवसांत ३०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी देखील चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल स्टारर ‘गदर २’ सिनेम रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. ट्रेंड रिपोर्टनुसार, सनी देओल यांच्या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये सातव्या दिवशी घट झाली आहे. ‘गदर 2’ ने सातव्या दिवशी 22 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘गदर 2’ चित्रपटाची एकूण कमाई आता 283.35 कोटींवर गेली आहे. (Gadar 2 Box Office Collection)

‘गदर 2’ 300 कोटींचा टप्पा लवकरच पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.. येत्या शनिवारी – रविवारी सिनेमा किती कोटी रुपयांता आकडा पार करेल आणि त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी काही कोटींची भर पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सातवा दिवस म्हणजे गुरूवारी सिनेमाने 22 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. पण थक्क करणारी गोष्ट म्हणजे सुट्टी नसताना देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. ( sunny deol gadar 2 box office collection day 7)

सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमा यंदाच्या वर्षातील दुसरा यशस्वी सिनेमा ठरला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सिनेमाने फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता ‘गदर 2’ सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने 543.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर 2’ ने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 242.20 कोटी रुपये कमावले होते. आता ‘गदर 2’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.