Sunny Leone | सनी लिओनीने सांगितला मुंबईच्या पावसातील भयानक अनुभव; गमावल्या 3 महागड्या गाड्या

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच 'कोटेशन गँग' या तमिळ चित्रपटात झळकणार आहे. विवेक के. कुमार दिग्दर्शित या चित्रपटात सनीसोबतच जॅकी श्रॉफ, प्रियामणी, सारा अर्जुन, व्ही. जयप्रकाश, विष्णू वारियर यांच्या भूमिका आहेत.

Sunny Leone | सनी लिओनीने सांगितला मुंबईच्या पावसातील भयानक अनुभव; गमावल्या 3 महागड्या गाड्या
Sunny LeoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 10:43 AM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईच्या पावसातील तिचा पहिला भयानक अनुभव सांगितला. या पावसात तीन महागड्या गाड्या गमावल्याचा खुलासा तिने केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी याविषयी व्यक्त झाली. मुंबईच्या पावसाबद्दल कोणतीच कल्पना तिला नव्हती. “एवढा पाऊस पडू शकतो याची मला काहीच कल्पना नव्हती. मी जेव्हा सुरुवातीला मुंबईत कामाला यायचे, तेव्हा समुद्राजवळील घरात राहायचे. तेव्हा माझ्या घराच्या भिंतीतून पाणी यायचं आणि बुरशीमुळे माझं बरंच सामान खराब झालं होतं. पण मला पावसाळा आवडतो. हा माझा सर्वांत आवडता ऋतू आहे. कारण पावसामुळे हवेत गारवा पसरतो आणि बाहेर जेव्हा सरी कोसळतात, तेव्हा त्यांना पाहून माझं मन तृप्त होतं”, असं ती म्हणाली.

याच मुलाखतीत सनी लिओनीने पावसाळ्यातील तिचा सर्वांत वाईट अनुभव सांगितला. “मी पावसात माझ्या तीन महागड्या गाड्या गमावल्या आहेत. एका दिवसात दोन गाड्या वाहून गेल्या. ते फार भयंकर होतं. कारण भारतात जेव्हा तुम्ही भारतात आयात केलेल्या कार खरेदी करता, तेव्हा त्यावर भरभक्कम कर द्यावा लागतो. तीन गाड्यांपैकी एक आठ आसनी मर्सिडीज ट्रक होता. मी खुश नव्हते, पण ठीक आहे. अशा गोष्टी घडतात आणि आपण भौतिक गोष्टी बदलू शकतो असा विचार मी केला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. आता मी खास पावसाळ्यासाठी तयार केलेला भारतीय बनावटीचा ट्रक चालवते. मी चुकीची कार खरेदी केली होती आणि आता मला भारतात बनवलेल्या कार आवडतात”, असं ती पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

पावसाने कधीच कामात अडथळा आणला नाही, असंही तिने स्पष्ट केलं. याविषयी ती म्हणाली, “मी आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झाले किंवा माझ्या मुलांना काही झालं तरच मी कामावर सुट्टी घेते. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत मी नेहमी कामासाठी तयार असते. पावसाळ्यात थोडा वेळ अधिक लागतो, पण सर्वजण कुठे ना कुठे तरी जुळवून घेत असतात.”

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटात झळकणार आहे. विवेक के. कुमार दिग्दर्शित या चित्रपटात सनीसोबतच जॅकी श्रॉफ, प्रियामणी, सारा अर्जुन, व्ही. जयप्रकाश, विष्णू वारियर यांच्या भूमिका आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.