Sunny Leone ने अभिनय सोडून सुरु केलं असं काम, व्हिडीओ तुफान व्हायरल

Sunny Leone : सिनेमांमध्ये दिसत नाही, तरी सनी लियोनी कोट्यवधी रुपयांची मालकीण.... तिने अभिनय सोडून सुरु केलं असं काम, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाल...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी लियोनी हिची चर्चा...

Sunny Leone ने अभिनय सोडून सुरु केलं असं काम, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 3:17 PM

मुंबई | 22 जानेवारी 2024 : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सनी कायम सक्रिय असते. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सनी लियोनी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. सनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सनी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे सनी चर्चेत आली आहे. नुकताच सनी नवीन रेस्टोरेंट सुरु केलं आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीने दिली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिच्या रेस्टोरेंटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सनी लियोनी हिने पती डेनियल वेबर याच्यासोबत दिल्ली येथील नोएडा याठिकाणी नवीन व्यवसाय सुरु केला आहे. सनी लियोनी हिने पतीसोबत सुरु केलेल्या रेस्टोरेंटचं नाव ‘चिकालोका’ असं आहे. अभिनेत्रीने तिच्या नवीन रेस्टोरेंट एक झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नव्या व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर सनी हिने मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘रेस्टोरेंट सुरु करण्याशिवाय इतर गोष्टींवर देखील मला काम करायचं आहे. मला असं वाटतं कलाकारांनी स्वतःला फक्त टीव्ही विश्व किंवा सिनेमांपर्यंत मर्यादित न ठेवता, इतर गोष्टींचा देखील विचार करायला हवा… आपल्या स्वतःच्या ब्रॉन्डचा आपल्याला स्वतःला विस्तार करता यायला हवा…’ असं देखील सनी म्हणाली…

सनी लिओनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.