रितेश देशमुखनंतर अंकिता लोखंडेसाठी सनी लियोनीची पोस्ट चर्चेत
बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात सतत भांडणं होत आहेत. अनेकदा हा वाद टोकाला पोहोचला आणि अंकिताला तिच्या सासूकडूनही बरंवाईट ऐकावं लागलं.
मुंबई : 17 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले जवळ आला असून स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. टॉप 3 मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी स्पर्धक आटोकाट प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर इतर सेलिब्रिटीसुद्धा आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देण्यासाठी पोस्ट लिहित आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्री अंकिता लोखंडेसाठी पोस्ट लिहिल्या आहेत. यामध्ये आता अभिनेत्री सनी लियोनीचाही समावेश झाला आहे. सनीने अंकितासाठी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून तिला पाठिंबा दर्शविला आहे. याआधीही रितेश देशमुख, रश्मी देसाई, अली गोणी यांसारख्या सेलिब्रिटींनी अंकिताची बाजू घेतली होती.
बिग बॉसच्या घरात सध्या अभिषेक कुमार, मुनव्वर फारुखी आणि अंकिता लोखंडे हे तिघे तगडे स्पर्धक मानले जात आहेत. अंकिताला अनेक सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळतोय. सनी लियोनीने लिहिलं, ‘बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेसाठी ऑल द बेस्ट अंकिता लोखंडे. माझा तुला पाठिंबा आहे.’ एकीकडे सनीने अंकिताच्या बाजूने पोस्ट लिहिली आहे, तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने अंकिता आणि विकीला सुनावलं आहे. बिग बॉसच्या घरात सतत खासगी गोष्टींबद्दल चर्चा केल्याप्रकरणी तिने दोघांवर टीका केली आहे.
All the best @anky1912 for #BB17 finale ..I am rooting for you girl!! 😘 . .#AnkitaLokhande #AnkitalsTheBoss
— Sunny Leone (@SunnyLeone) January 16, 2024
‘सतत नॅशनल टीव्हीवर एकाच गोष्टीबद्दल चर्चा करत असाल, तर त्याचा बाहेर मुद्दा होणारच. घरातल्या गोष्टींवर घरी जाऊन चर्चा करा. काय आवडलं, काय नाही आवडलं, स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टींवर घरात का चर्चा करत आहात? आपल्या नात्यांचं अशाप्रकारे तमाशा करू नका. बिग बॉसच्या बाहेरसुद्धा एक जग आहे’, अशा शब्दांत काम्याने सुनावलं आहे.
Baar baar ek hi baat National Tv par karoge toh uss baat ka baahar mudda banega hi, ghar ki baatien ghar jaakar karo, kya achha laga kya bura laga, clarifications,explainations, insecurities why here? Apne rishton ka yun tamasha naa banao #BB17 ke baahar bhi duniya hai @ColorsTV
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) January 16, 2024
‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क न ठेवता बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाशी जुळवून घेत स्पर्धेत टिकून राहणं खूप आव्हानात्मक असतं. अशातच जवळच्या व्यक्तींकडून साथ मिळाली नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या स्पर्धकावर होतो. असंच काहीसं सध्या ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडेसोबत घडताना दिसतंय. अंकिताने ऑक्टोबर महिन्यात पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत विविध कारणांवरून वाद होताना दिसतंय. पतीसोबतचे वाद असतानाच अंकिताची सासू म्हणजेच विकी आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये करताना दिसतेय.