प्रायव्हेट जेट, शाही व्यवस्था, पण अंबानींकडून मिळालेली वागणूक म्हणजे…, रजनीकांत यांच्या लेकीचं मोठं वक्तव्य

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये अंबानी कुटुंबियांनी पाहुण्यांना कशी दिली वागणूक? आतील सत्य रजनीकांत यांच्या मुलीने सांगितलंच..., सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल...

प्रायव्हेट जेट, शाही व्यवस्था, पण अंबानींकडून मिळालेली वागणूक म्हणजे..., रजनीकांत यांच्या लेकीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 12:17 PM

मुंबई | 6 मार्च 2024 : सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबियांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे. प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी साऊथ, बॉलिवूडपासून हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. प्री-वेडिंगमध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील उपस्थित होती. आता ऐश्वर्या हिने अंबानी कुटुंबियांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

ऐश्वर्या हिने जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांचं कौतुक केलं. एवढंच नाहीतर, दोघे उत्तम होस्ट देखील आहेत. कार्यक्रम देखील फार सुंदर होता… असं रजनीकांत यांची लेक म्हणलाी. ‘अनंत – राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा भन्नाट होता. आई – बाबांसोबत व्यतीत केलेले तीन दिवस कधीच विसरणार नाही..’

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्याने फोटो पोस्ट करत पूर्ण प्रवासाबद्दल सांगितलं आहे. प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गेल्या चार पाच दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबियांची चर्चा रंगली आहे.

गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस हा भव्यदिव्य प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात फक्त सेलिब्रिटी नाहीतर, उद्योजक, राजकारणातील व्यक्तींची देखील उपस्थिती होती. शाही पद्धतीत कार्यक्रमाची सजावट करण्यात आली होती.

सोशल मीडियावर सध्या अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनंत – राधिका एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनंत – राधिका 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता धनुष याच्यासोबत घटस्फोटानंतर ऐश्वर्या तुफान चर्चेत आली होती. ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं देखील आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.